नेहमी नेहरू-गांधी घराण्याचा उल्लेख केला जातो. तुम्ही काय केलं तेही सांगा,
मुंबई, 10 फेब्रुवारी : ‘जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तारीख ठरत नाही, किंवा ते ठरवत नाही. तोपर्यंत त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण, पंतप्रधानांनाच मुंबई पालिका जिंकायची आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या या दौऱ्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. तसंच, बच्चू कडू यांच्या दाव्यातूनही हवा काढली. जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तारीख ठरत नाही, किंवा ते ठरवत नाही. तोपर्यंत त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण, मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी या राज्यातील भाजप आणि मिंधे गटाला जिंकणे अशक्य आहे. किंवा मोदीआले आणि सगळा देश जरी लावला तरी ते जिंकू शकत नाही, याची खात्री झाली आहे त्यामुळे मोदींचा पत्ता सारखा टाकत आहे. (‘मविआ’मधील आमदार फुटीच्या दाव्यावर जयंत पाटलांची सावध भूमिका म्हणाले…) पंतप्रधानांवर टीका करायची नाही, दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी भाजपला घेरले असताना पंतप्रधान मुंबईत येत आहे. वंदे मातरम रेल्वे हे फक्त निमित्त आहे. मुंबई पालिका त्यांना जिंकायची आहे. पंतप्रधान मोदींना मुंबई जिंकायची आहे, ठीक आहे त्यांची तयारी असेल तर आम्हीही तयार आहोत, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं. विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये भाजपला घेरले आहे. राहुल गांधींनी मोजकेच आणि सोपे प्रश्न विचारले आहे, पण त्याचे उत्तर का देत नाही, असा सवालही राऊतांनी मोदींना केला. (chinchwad by poll election : चिंचवडमध्ये मविआसमोर मोठा पेच, सेनेच्या बंडोबांमुळे भाजपला होईल फायदा?) काँग्रेसने आणीबाणी आणली होती, पण आता तुम्ही काय करत आहात. नेहमी नेहरू-गांधी घराण्याचा उल्लेख केला जातो. तुम्ही काय केलं तेही सांगा, असा सवालही राऊतांनी मोदींनी केला. बच्चू कडू सुद्धा शिंदे गटामध्ये जात आहे का, असं कोण काय बोलतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मला माहिती आहे की, भाजपचे काही आमदार शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे, बच्चू कडूंची माहिती खरी आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.