मुंबई, 11 जून : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा भाजपच्या धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पराभव केला. महाविकास आघाडीने रणनिती आखत अपक्ष आणि लहान पक्षांना आपल्यासोबत घेत विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र, ऐन निवडणुकीत भाजपची खेळी यशस्वी ठरली आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांची मते मिळाली. मात्र, अपक्ष आणि लहान पक्षांची मते भाजपला मिळाली. आता ही मते नेमक कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत थेट नावेच जाहीर केली आहेत. (Sanjay Raut disclosed name of MLA’s who vote for BJP in Rajya Sabha Election) संजय राऊत म्हणाले, छोटे पक्ष आहेत जे महाविकास आघाडीसोबत आहेत त्यांचे एकही मत फुटलं नाही. जे आघाडीसोबत आहेत ती सर्व मते आम्हाला मिळाली. फक्त घोडेबाजारात जे काही उभे होते लोकं.. त्यांची सहा-सात मते आम्हाला मिळू शकले नाहीत. आम्ही कुठलाही व्यवहारात पडलो नाही. आम्ही व्यापारही केला नाही. तरीही आमच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली हा सुद्धा आमच्यासाठी एक विजय आहे. अर्थात ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नावे आमच्याकडे आहेत. आम्हााल माहिती आहे कुणी मतदान केलं नाही. ठिक आहे पाहून घेऊयात. वाचा : भाजपने डाव साधला; मविआच्या गोटात खळबळ, महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग निवडणुकीत कुठल्या आमदारांकडून दगाबाजी? शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, मी 42 मतांवर लढलो आणि त्यातही एक मत बाद झालं. काही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते आणि ती मते बाद करण्याच्या प्रयत्नात होती. आमच्या लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. संजय पवार हे सुद्धा उत्तम प्रकारे लढले. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपने अक्षरश: पाऊस पाडला. वाचा : महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ’; निकालाचा हायव्होल्टेज ड्रामा, मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा संजय पवार यांच्या पराभवाने उद्धव ठाकरे सुद्धा व्यथिथ झाले आहेत. कार्यकर्ता पक्षासाठी लढत असतो. आम्हाला असं वाटलं की, काही लोकांनी आम्हाला शब्द दिले होते ते पाळले नाहीत. विशेषत: वसई-विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय मामा शिंदे, अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे यांची मते आम्हाला मिळाली नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी थेट आमदारांची नावेच जाहीर केली आहेत.