देवेंद्र भुयारांनी खरंच भाजपला मतदान केलं? राऊतांच्या आरोपांत किती तथ्य? स्वत: भुयार म्हणाले, "माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण..."
अमरावती, 11 जून : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार (Shiv Sena candidate Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर अपक्ष आणदार आणि लहान पक्षांच्या आमदारांनी दगाफटका करत भाजपला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. इतकेच नाही तर थेट सहा आमदारांची नावेच संजय राऊतांनी जाहीर केली आहेत. यामध्ये अमरावतीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Independent MLA Devendra Bhuyar) यांच्या नावाचाही समावेश आहे. संजय राऊत यांच्या आरोपांवर आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र भुयारांनी फेटाळले संजय राऊतांच्या आरोपांवर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, संजय राहेत हे काय ब्रह्मदेव आहेत का? मतदान हे गोपनीय राहतं. आम्ही दिलं की नाही दिलं हे यांना कसं माहिती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत मी पूर्वीपासून आहे. शिवसेना नंतर आली. मी महाविकास आघाडीसोबत आहे. मी कुठलाही दगाफटका केला नाही. वाचा : निवडणुकीत कुठल्या आमदारांची मते मिळाली नाही? संजय राऊतांनी थेट आमदारांची नावेच केली जाहीर मुख्यमंत्र्यांवर माझी नाराजी आहे. नाराजी माझी काही व्यक्तीगत नाहीये. मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कमी पडले. त्यांनी तो वेळ दिला नाही. आमचा संपर्कच झाला नाही. ही खंत बोलून दाखवली मी. हे बोलून दाखवणं गरजेचं आहे नाहीतर त्यांना कळणार कसं? आता आमचे सर्व आमदारांचे ते प्रमुख आहेत. तर मग कुटुंब प्रमुखांना सांगणार नाही तर काय दाऊद इब्राहिमला सांगणार का आमचे प्रश्न? असा सवालही आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे म्हटलं आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढे म्हटलं, पहिल्या पसंतीचं मत हे शिवसेनेचे कोल्हापुरचे उमेदवार संजय पवार यांना दुसऱ्या पसंतीचे मत संजय राऊत यांना आणि तिसऱ्या पसंतीचे मत प्रफुल्ल पटेल यांना द्यावा लागेल. त्यांनी जो क्रम सांगितला त्यानुसार मी मतदान केलं. मतदानानंतर सुद्धा मी माध्यमांना सांगितलं की कुणाला मतदान केलं. वाचा : भाजपने डाव साधला; मविआच्या गोटात खळबळ, महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग भाजपकडे जाण्याचं काही कारणच नाही. कारण भाजपत माज्या विरोधातच उभे असलेले अनिल बोंडे उमेदवार होते. त्यामुळे बोलण्यापूर्वी याचा संजय राऊत यांनी विचार करायला हवा होता. पहिल्या पसंतीची मते आम्ही अपक्षांनी दिले आहेत. काही आमदारांवर सीबीआय, ईडीचं प्रेशनर आणि त्यामुळे दडपणामुळे त्यांनी मतदान केलं नसावं असंही देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.