JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात मोठी घडामोड, मविआचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात मोठी घडामोड, मविआचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

जाहिरात

राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात मोठी घडामोड, मविआचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जून : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलां आहे. हा उमेदवार म्हणजे कोल्हापूरचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आहेत. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, सहावी जागा विजयी होण्याइतकं बहुमत कुठल्याही पक्षाकडे नसल्याने या जागेवर दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. त्याच दरम्यान आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडत आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई, सतेज पाटील या नेत्यांचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची थोड्याचवेळाता भेट घेणार आहेत. या भेटीत काय ठरतं? आणि भाजप आपला तिसरा उमेदवार मागे घेतं का? हे पहावं लागणार आहे. वाचा :  मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण, वॉर्ड पुर्नरचनेवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत सात उमेदवारांपैकी एका उमेदवाराने त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला तर, सहा जागांसांठी सहाच उमेदवार असल्यामुळे या सर्व उमेदवारांना निवडणूक आयोग बिनविरोध विजयी घोषत करेल. मात्र सातही उमेदवारांपैकी एकानेही त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मग प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यावेळी राज्यसभेच्या सहव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप असा अटी तटीचा सामना बघायला मिळणार आहे. भाजपचे राज्यसभेसाठी उमेदवार भाजपकडून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, भाजपकडे तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपची बैठक राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भाजपने शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आज (3 जून) राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्वा प्राप्त झाले आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,आशिष शेलार, प्रविण दरेकर, प्रसाद लाड उपस्थित राहणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या