JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / उद्धव सरकारवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरे घेणार आज मोठा निर्णय

उद्धव सरकारवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरे घेणार आज मोठा निर्णय

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर नजर ठेवण्यासाठी मनसेचं हे शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे.

जाहिरात

Kolhapur: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray addresses a rally for the ongoing Lok Sabha polls, at Ichalkaranji in Kolhapur, Tuesday, April 16, 2019. (PTI Photo) (PTI4_16_2019_000215B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जानेवारी : पक्षाचा झेंडा बदलणं आणि हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे आज मनसेच्या महत्वाच्या नेत्यांसोबत रंगशारदा इथं बैठक घेणार आहेत. शॅडो कॅबिनेट निवडीसंदर्भात ही बैठक महत्त्वाची असणार आहे. मनसेच्या अधिवेशनानंतर होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 23 जानेवारीला मनसेच्या महामेळाव्यात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करत पक्षाची नवी भूमिकाही जाहीर केली होती. त्यावर राज्यात नवी राजकीय चर्चा सुरू झाली होती. याच सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर नजर ठेवण्यासाठी मनसेचं हे शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक होणार असून त्यांना कुठली जबाबदारी दिली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आता रात्रीही करा Enjoy, मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरू

शॅडो कॅबिनेट म्हणजे नेमकं काय? - विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. - अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली. - कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे 15 ते 20 मंत्री असतात. - राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. - काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र 33 मंत्र्यांचा समावेश. - त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी असेल.

मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पंकजा मुंडे आज उपोषण करणार

महाअधिवेशनात राज ठाकरे काय म्हणाले? मनसेची सुरुवात करताना जो झेंडा माझ्या मनात होता तोच हा झेंडा आहे असा खुलासा त्यांनी केली. गेली अनेक दिवस या झेंड्याची चर्चा सुरू होती. जेव्हा आम्ही मनसेच्या चौरंगी झेंड्यांची चर्चा करत होतो तेव्हाही खूप चर्चा झाली. त्यावेळी तो झेंडा आम्ही घेतला. मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे… मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन.

कोरोना व्हायरसने भारताचा धोका वाढवला, चीनहून आलेला विद्यार्थी जयपूर रुग्णालयात

जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही. पण सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते. हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे. धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही. आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हाकलून द्या हे सांगणारा पण मीच होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या