JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ठाणे महिला अधिकाऱ्यावर हल्ल्यानंतर राज ठाकरे संतापले, "पोलिसांच्या तावडीतून सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल"

ठाणे महिला अधिकाऱ्यावर हल्ल्यानंतर राज ठाकरे संतापले, "पोलिसांच्या तावडीतून सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल"

ठाण्यातील महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) महिला अधिकाऱ्यावर सोमवारी सायंकाळी फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला (attack on TMC Assistant Commissioner) केला. कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) असं या महिला अधिकारीचे नाव असून या हल्लात त्यांची बोटे छाटली आहेत. कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरिवाला म्हणून फिरता येणार नाही ना त्या दिवशी यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. निषेध करुन ही लोक सुधरणारी नाहीयेत. आम्ही हे वारंवार सांगत होतो. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटली जातात? आज पकडले गेलेत उद्या जामीन होईल आणि परत हे बाहेर दुसऱ्यांची बोट तोडायला. ‘हे’ घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचं? राज ठाकरेंचा हल्लाबोल कल्पिता पिंपळे या ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे आणि त्यांचा सुरक्षा रक्षक पालवे या दोघांना ठाण्यातील जुपीटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ठाणे मनपाची टीम अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी दाखल झाली त्यावेळी फेरीवाल्याने धारदार शस्त्राने साय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी अमरजित यादव या भाजी विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच अमरजित यादव याच्यावर हल्ल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या