JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / बंगालमध्ये मोदींचा विजयरथ रोखणारे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला

बंगालमध्ये मोदींचा विजयरथ रोखणारे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट (Prashant Kishor’s Meeting With Sharad Pawar) घेण्यासाठी पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघांमध्ये बऱ्याच वेळेपासूव चर्चा सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 जून: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट (Prashant Kishor’s Meeting With Sharad Pawar) घेण्यासाठी पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघांमध्ये बऱ्याच वेळेपासून चर्चा सुरू आहे. भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे तसंच ही भेट नेमकं कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत अद्यापही उत्सुकता कायम आहे. बंगालमध्ये प्रशांत किशोर यांचा ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या विजयात मोठा वाटा आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर राजकीय रणनितीकार राहणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली. अशात आता शरद पवारांसोबतच्या भेटीचे विविध तर्क लावले जात आहेत. कसा असणार यंदाचा पायी वारी सोहळा, जाणून घ्या सविस्तर पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली होती. मात्र, भाजपला याठिकाणी तीन अंकी आकडाही गाठता आला नाही. ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये बहुमतानं विजय मिळवला आहे. यानंतर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकाचा चेहरा म्हणून कोण असणार यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत. यूपीएच्या नवीन नेतृत्वाचाही सध्या शोध सुरु आहे. यामध्ये शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाणार का? अशाही चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या