JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / तरुणीच्या आत्महत्येनंतर शिवसेना मंत्र्यावर गंभीर आरोप, अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन

तरुणीच्या आत्महत्येनंतर शिवसेना मंत्र्यावर गंभीर आरोप, अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी : पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी अखेर मौन सोडलं आहे. ‘या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल.जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने…एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे…असाही प्रयत्न होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात आपली भूमिका जाहीर केली आहे. महिला आयोगानं महाराष्ट्र सरकारला पाठवली नोटीस पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

विरोधी पक्ष आक्रमक पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. शिवशाहीच्या तत्कालीन सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी ‌ज्या‌ मंत्र्यांवर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांचे राजीनामे घेतले होते. आता त्यांचे सुपुत्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तो ठाकरी बाणा दाखवत राजीनामा घेतील का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज शिवसेनेच्या एका मंत्र्याशी सुसंगत असून या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून सत्य जनतेच्या समोर यायला हवे, अशी मागणी देखील दरेकरांनी केली आहे. शिर्डीत साईदर्शन घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या