JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे राजकीय खळबळ; भाजप-सेना युतीबाबत भाजपकडून पहिल्यांदा मोठी प्रतिक्रिया

प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे राजकीय खळबळ; भाजप-सेना युतीबाबत भाजपकडून पहिल्यांदा मोठी प्रतिक्रिया

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaiks letter ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery)यांना पत्र लिहिलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaiks letter ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery)यांना पत्र लिहून ‘भाजपशी हात जुळवून घ्यावे, भविष्यात तेच चांगले राहिल’ अशी विनंती केल्यामुळे सेनेत खळबळ उडाली आहे. पण या पत्रामुळे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थितीत झाले आहे. दरम्यान या प्रकरणात आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. प्रताप सरनाईक यांचं पत्र हे शिवसेना आमदारांच्या उद्विगनेतून आलं असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप युती पुन्हा होणार असेल तर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. हे पत्र ईडीच्या दबावाखाली लिहिलेलं नाही तर त्या शिवसैनिकांच्या भावना आहेत, असंही ते यावेळी म्हणाले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सेना भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा युती व्हावी असं वाटतं स्वाभाविक आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मलाही तसंच वाटण्यात गैर ते काय? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. हे ही वाचा- मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! नाही वाढणार प्रॉपर्टी टॅक्स मुळात प्रताप सरनाईक यांनी हे पत्र 9 जून रोजी लिहिलं होतं. त्यानंतर आज 10 दिवसांनी माध्यमांसमोर आले आहे. म्हणजे, शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाल्यानंतर हे पत्र समोर आले आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही महिन्यांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सरनाईक शक्यतो माध्यमांसमोर येत नाही. गेल्या 3 महिन्यांपासून ते गायब होते आणि आज या पत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे युती करावी, अशी विनंतीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ‘आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच’ अशी विनंतीच सरनाईक यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या