JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत पोलिसाचा हायहोल्टेज ड्रामा, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढला, पाहा VIDEO

मुंबईत पोलिसाचा हायहोल्टेज ड्रामा, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढला, पाहा VIDEO

लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याने उडी मारण्याची धमकी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जून : मुंबईतील दादर परिसरात एका इमारतीत मनोरुग्णाचा हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या मनोरुग्णाने थेट इमारतीच्या टेरेसवर जाऊन खाली उडी मारण्याची धमकी दिली. सुदैवाने वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन या व्यक्तीला वाचवले. मुंबईतील दादर भागातील शिंदेवाडी इथं असलेल्या एका इमारतीत आज दुपारी मनोरुग्णाने स्थानिकांच्या काळजाचा ठोका चुकवला. इमारतीचा 3 मजला अधिक टेरेस अशा चौथ्या मजल्यावर हा मनोरुग्ण दुपारपासून जाऊन बसला होता. त्यानंतर छज्यावर चढून इकडे तिकडे बिनधास्तपणे फिरत होता.

संबंधित बातम्या

एवढंच नाहीतर लोकांनी त्याला अडवण्याचा  प्रयत्न केला तर त्याने उडी मारण्याची धमकी दिली. हा मनोरुग्ण एक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. त्याने उडी मारण्याची धमकी दिल्यामुळे वातावरण आणखी गंभीर झाले. स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीसही परिसरात पोहोचले. आधी या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तो काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. हेही वाचा - पुण्यात हॉटेल चालकाचा निर्घृण खून, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून संपवलं अखेर मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी एकत्रित या व्यक्तीला रेस्क्यू केलं. या व्यक्तीला रेस्क्यू करण्याआधी खाली गाद्या आणि फ्लोटर्स टाकण्यात आले होते. दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याची धमकी का दिली आणि त्याची ओळख काय होती, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या