JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / कोरोनाचं थैमान,‌ उद्धव ठाकरे यांनी PM मोदींसोबत केली महत्त्वपूर्ण चर्चा

कोरोनाचं थैमान,‌ उद्धव ठाकरे यांनी PM मोदींसोबत केली महत्त्वपूर्ण चर्चा

कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासंदर्भात सुरू असलेल्या उपाय योजनांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनद्वारे चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासंदर्भात सुरू असलेल्या उपाय योजनांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दिल्लीतील तब्लिघी ए जमातचे सदस्य महाराष्ट्रात आले आहेत. त्यांचा शोध घेऊन विलगीकरण करण्या संदर्भात महत्वाची चर्चा झाली. दिल्लीतील ताब्लिक इ जमातच्या मरकझ मध्ये मराठवाड्यातून मोठ्या संख्येने लोक गेल्याचं पुढं आलं आहे. हे लोक आता परत आले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. दरम्यान हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर आता शोधाशोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार औरंगाबादचे 43 लोक सहभागी झाले होते, त्यातील 29 लोकांना क्वारन्टाइन करण्यात आले आहे. संबंधित लोकांमध्ये सध्या तरी कुठलीही लक्षण नाहीत. तर इतरांचीही प्रकृती बरी आहे. फक्त औरंगाबाद नाही तर नांदेडचे 13, उस्मानाबादचे 8 हिंगोलीचे 2, परभणीचे 2 , जालनाचे 5 रहिवासी आहेत. यापैकी बहुतांश जणांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे. दिल्लीत एका लग्नात गेलेल्या 6 जणांनाही क्रांती चौक पोलिसांनी तपासणीसाठी पाठवले आहे. हे लोक एक महिना दिल्लीत होते. 27 तारखेला ते परत आले. आता त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, तर 2 जण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. यवतमाळ निजामुद्दीन (दिल्ली) येथील संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी झाले होते. तशी यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले 5 जण परत आले असून त्यांना विलागीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 7 जण अद्यापही जिल्ह्यात परत आले नाही. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात / राज्यात गेल्याची किंवा दिल्लीतच थांबण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. चंद्रपूर दिल्लीच्या जमातचे जिल्ह्यात वाढते कनेक्शन, एकूण 49 जमाती निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी 7 जणांची पटली ओळख आहे, तर 3 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. अन्य व्यक्तींचा शोध सुरू आहे. अमरावती दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात अमरावतीचे पाच जण सहभागी झाली होते. या पाचही जणांचे थ्रोट स्वाब तपासणीला पाठवले. ग्रामीण रुग्णालयात क्वारन्टाइन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. अहमदनगर अहमदनगरमध्ये आलेले 24 जण हे निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमामधील आहे. त्यामधील 2 जण जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नेवासामधून 10 तर नगरमध्ये 14 जण आले होते. सांगली दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील 3 जण गेल्याची माहिती समोर आली आहे. या 3 जणांना तातडीने क्वारन्टाईन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचे आदेश कोल्हापूर दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जण गेले होते. या 21 जणांना तातडीने क्वारन्टाइन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांनी पोलिसांच्या मदतीने क्वारन्टाईन करावे…दिल्लीतल्या कार्यक्रमात 21 जणांचा सहभाग ही जिल्ह्यात चिंता वाढवणारी गोष्ट असल्याची चर्चा आहे. बापरे! Coronavirus ने लहान मुलांनाही बनवलं आपलं शिकार, 2 रुग्णांचा मृत्यू धक्कादायक! 25 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू, भारतात व्हायरसचा सर्वात तरुण बळी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या