JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Platform tickets price update: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटमध्ये कपात

Platform tickets price update: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटमध्ये कपात

मध्य रेल्वे (Central Railway) ने कोव्हिड निर्बंधामध्ये शिथिलता आल्यानंतर आता प्लॅटफॉर्म तिकिटात कपात केली आहे. आता दहा रुपयात मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 नोव्हेंबर: मध्य रेल्वे (Central Railway) ने कोव्हिड निर्बंधामध्ये शिथिलता आल्यानंतर आता प्लॅटफॉर्म तिकिटात कपात केली आहे. आता दहा रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket in 10 Rs) मिळणार आहे. स्टेशनवर प्रवाशांची  होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोना महामारीत प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 50 रुपये करण्यात आली होती. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकावर 10 रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे. हे बदल 25 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. मध्य रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, ‘कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता लक्षात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 50 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे.’ रेल्वेने सर्व बुकिंग कर्मचारी आणि पर्यवेक्षकांना बदल स्वीकार करण्याची आणि यानुसार काम करण्याची सूचना दिली आहे. हे वाचा- SBI ग्राहकांसाठी खास भेट! केवळ 4 स्टेप्समधून मिळवा पर्सनल लोन मोबाइल फोनवरून उपनगरीय रेल्वे तिकीट बुक करू शकता यासोबतच, मध्य रेल्वेने म्हटले आहे की उपनगरीय रेल्वेचे प्रवासी ज्यांनी अँटी-कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते आता रेल्वेच्या अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) अॅपद्वारे त्यांच्या मोबाईल फोनवर सिंगल प्रवास आणि सीझन तिकीट बुक करू शकतात. हे अॅप राज्य सरकारच्या युनिव्हर्सल पास प्रणालीशी जोडण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. हे वाचा- स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, यूटीएस अॅप आणि युनिव्हर्सल पास सिस्टीमच्या एकत्रीकरणामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय तिकीट बुक करता येणार आहे. लाहोटी म्हणाले, ‘ज्या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि शेवटचा डोस दिल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना राज्य सरकारचा सार्वत्रिक पास घ्यावा लागेल जो लसीकरण स्थितीची पडताळणी केल्यानंतर जारी केला जाईल.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या