JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Lockdown चे नियम मोडून फिरणाऱ्यांना तासभर फुकटचा सल्ला, शिवाजी पार्क पोलिसांची अनोखी गांधीगिरी

Lockdown चे नियम मोडून फिरणाऱ्यांना तासभर फुकटचा सल्ला, शिवाजी पार्क पोलिसांची अनोखी गांधीगिरी

Shivaji park police Gandhigiri पोलिस एकत्र फिरणाऱ्यांवर कारवाई करत परिसरात राहत असलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना लॉकडाऊनच्या नियमांचे महत्त्वच समजावून सांगतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मे : कोरोना संसर्गाला (coronavirus) आळा घालण्याच्या दृष्टीनं सार्वजिनिक ठिकाणी खेळांच्या मैदानातही नागरिकांना प्रवेश बंद आहे. मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कमध्येही (Shivaji Park) कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तरीही काही नागरिक फिरण्यासाठी याठिकाणी येतात. विशेष म्हणजे, एकत्रितरित्या फिरत संचारबंदीचं ते (Lockdown) उल्लंघन करतात. अशा नागरिकांसाठी पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. (Gandhigiri by Police) (वाचा - पराभवाचीही सवय लावून घ्या, हे आता वारंवार होणार! भुजबळांचा चंद्रकांतदादांना टोला ) संचारबंदीच्या नियमांमुळं शिवाजी पार्क मैदानाच्या आत मधील बाजू नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली आहे. क्रिकेट खेळणारे प्रशिक्षक, विद्यार्थी असो किंवा पोलीस परीक्षेचा सराव करणारे उमेदवार सर्वांनाच प्रवेशबंदी आहे. तरीही अनेक नागरिक सकाळी फिरण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात येतात. पोलिस एकट्याने फिरणाऱ्यांना काही बोलत नाहीत. पण अनेक कट्ट्यावर बसल्याप्रमाणे एकत्रितरीत्या फिरत असतात. त्यामुळं याठिकाणी पोलिस गांधीगिरीचा मार्ग अवलंबत आहेत. अशा लोकांना थांबवून पोलिस त्यांना ताब्यात घेतात. पण पोलीस स्टेशनला न नेता शिवाजी पार्क परिसरात या नागरिकांना थांबवून त्यांना तासभर डॉक्टरांचा फुकटचा सल्ला ऐकवला जातो. याच परिसरात राहणारे डॉक्टर नागरिकांना मार्गदर्शन करतात. (वाचा- ‘भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकलीय’ ) डॉक्टर दिनेश आजगावकर हे स्त्री रोग तज्ञ असून शिवाजी पार्क परिसरात राहतात. सध्या पोलीस आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून ते काम करत आहेत. आजगावकर नागरिकांना एकत्र येण्याचं टाळणं किती गरजेचं आहे याची माहिती पटवून देतात. दरम्यान शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना तासभर शिवाजी पार्क परिसरातच ताब्यात ठेवून नंतर मार्गदर्शन देऊन सोडलं जातं. पुन्हा फिरायला न येण्याचं आश्वासन देऊन त्यांना सोडलं जातं. त्यामुळं नागरिकांच्याच रक्षणासाठी पोलिस उचलत असलेल्या या पावलाचं कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या