मुंबई 05 फेब्रुवारी : मनसेने आपल्या महाअधिवेशनात झेंडा बदलल्यानंतर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका जाहीर केली होती. आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून मनसे 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाही काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घुसखोरांच्या प्रश्नावर ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. आणि राज ठाकरेंना टोलाही लगावला. NRC आणि CAAवरून देशभर सध्या वादळ सुरु आहे. त्यांनी यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि त्याच बरोबर CAAवरून संघर्षाची भूमिकाही टाळली. शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने NRC आणि CAAविरोधात विधानसभेत ठराव मंजूर करावा अशी मागणी करत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी ही शक्यता फेटाळून लावलीय. उद्धव ठाकरे म्हणाले, घुसखोरांचा विषय हा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. शिवसेनेने त्यांच्या विरोधात आंदोलनही केलंय. घुसखोरांना देशाबाहेर हाकललेच पाहिजे. घुसखोरांविरोधातल्या आंदोलनाचं श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोलाही त्यांनी राज ठाकरेना लगावला. NRC आणि CAAवर काय म्हणाले मुख्यमंत्री? मुलाखतीत त्यांनी यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि त्याच बरोबर CAAवरून संघर्षाची भूमिकाही टाळली. शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने NRC आणि CAAविरोधात विधानसभेत ठराव मंजूर करावा अशी मागणी करत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी ही शक्यता फेटाळून लावलीय. ते म्हणाले, NRC आणि CAA हे वेगळे विषय आहेत. NRCचं अजुन काहीच नाहीये. गृहमंत्री अमित शहांनी हे येणार नाही असंच सांगितलंय. पण NRC आलाच तरीही आम्ही तो महाराष्ट्रात येवू देणार नाही. NRC हा हिंदुच्याही मुळावर येणार आहे हे लक्षात ठेवा. सगळ्यांनाच आपलं नागरीकत्व सिद्ध करावं लागणार आहे.
तर CAA हा कुणाचं नागरीकत्व हिरावून घेणारा कायदा नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शेजारी देशातून जे शरणार्थी आलेले आहेत त्यांना नागरीकत्व देणारा हा कायदा आहे. याविषयी शाहीन बाग सारखे जी आंदोलनं सुरु आहेत त्याची काहीही गरज नाही. त्याच बरोबर विधानसभेत त्या विरोधात ठराव करण्याचीही काहीही गरज नाही. मात्र सरकारने असे कायदे आणताना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असंही ते म्हणाले. धक्कादायक! 3 रीच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचलं, त्यानंतर मृत समजून… ठाकरे पुढे म्हणाले, महाआघाडीचं सरकार उत्तमपणे सुरू असून काहीही काळजी करू नये असंही ते म्हणाले. शरद पवारांकडे रिमोट कंट्रोल नसून ते मार्गदर्शन करतात. त्यांच्याजवळ मोठा अनुभव आहे. दिल्लीत जावून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अजित पवार हे ताकदीचे नेते आहेत. त्यांना उत्तम जाण आहे. जे झालं ते झालं मात्र आता अजित पवार असो की अशोक चव्हाण ते मंत्रिमंडळात उत्तम सहकार्य करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.