An employee prepares emergency medical care for patients with suspected coronavirus infection in the Illinsky hospital in Krasnogorsk, outside Moscow, Russia, Thursday, March 26, 2020. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (Sergey Vedyashkin, Moscow News Agency photo via AP)
नवी मुंबई 27 मार्च : मुंबई आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहे. नवी मुंबईत एका कुटुंबातल्या दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या कुटुंबातल्या तिघांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईतला हा 8वा कोरोनाबाधित रुग्ण आहे. आता या चौघांवरही मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत आज विदेशातून आलेले 95 नागरीक आढळून आलेत. त्या सगळ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. नवी मुंबईतल्या एका मशिदीमध्ये फिलिपाईन्सचा नागरीक आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याच्यामुळे मशिदीतल्या मौलानांना लागण झाली. नंतर त्यांचा मुलगा, सून आणि आता नातवालाही लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
शहरात एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण
-- 1 फिलिपाईन्स नागरिकांचा मृत्यू
-- 690 नागरिक होम कोरोंटाइन मध्ये
-- 9 नागरिक कस्तुरबा रुग्णालयात सध्या दाखल
-- 8 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत
-- 81 जण अलगिकरण कक्षात उपचार घेताहेत
हे वाचा - BREAKING ब्रिटनला मोठा धक्का, पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आज पुन्हा भर पडली आहे. दिवसभरात 9 रुग्णांची नोंद झाली. त्यांना भाभा रुग्णालयात आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 86 झाली आहे. काल मुंबईत एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शहरात आतापर्यंत 5 मृत्यू झाले आहेत. राज्यातच नाही तर देशात हा सगळ्यात जास्त आकडा आहे. मुंबईत आज सापडलेल्या 9 कोरोनाग्रस्तांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष आहेत. यातल्या तिघांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात तर 6 जणांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. हे वाचा - बापरे… स्पेन आणि इटलीत ‘मॉल’चं झालं शवगृह, दफविधीसाठीही वेटिंगलिस्ट 26 मार्चला हिंदुजा रुग्णालयात एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.