JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / नवी नियमावली जाहीर, मेट्रो उद्यापासून सुरू ; तर 50 टक्के शिक्षकांना शाळेत येण्यास परवानगी

नवी नियमावली जाहीर, मेट्रो उद्यापासून सुरू ; तर 50 टक्के शिक्षकांना शाळेत येण्यास परवानगी

राज्य सरकारने अनलॉकची नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर : गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या मुंबई मेट्रो सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर अनलॉकच्या आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहे. शाळेत 50 टक्के शिक्षकांना हजर राहण्याचे मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉकची नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुकानं उघडण्यासाठी अटी आणखी शिथिल करण्यात आल्या आहेत. यापुढे दुकानं ही सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे. शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येणार आहे. 50 टक्के शिक्षकांना क्षमतेनं शाळेत बोलावता येणार आहे. परंतु,31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे. काळ्या जादूमुळे वडील गेले, मुलांनी बदला घेण्यासाठी रचला डाव, पण… त्याचबरोबर ग्रंथालय सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे आता ग्रंथालय खुली करण्यात आली आहे.  त्यामुळे राज्यातील आता सर्व ग्रंथालय सुरू करता येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली होती. आता मात्र, आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, कंटेनमेंट झोन वगळता आठवडी बाजार भरवता येणार आहे. याबद्दलचा निर्णय घेण्यास पालिका प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे. RTPCR किटवरून मंत्र्यांमध्येच विसंवाद, देशमुखांनी फेटाळलं टोपेंचं मत राज्यात मंदिरं उघडण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने राज्यभरात आंदोलन केले आहे. मंदिर उघडल्यामुळे परिसरातील फुल विक्रेते, फळ विक्रेते आणि यावर उपजिविका भागवणाऱ्या वर्गावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे मंदिरं उघडण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. अनेक संस्थानांच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली आहे. परंतु, मंदिरं उघडण्याबाबत या नियमावलीमध्ये कोणतीही घोषणा करण्यात आले नाही. त्यामुळे आगामी काळात यावरून आणखी वाद पेटण्याची चिन्हं आहे. नवीन नियमावली जाहीर   मेट्रो 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार सकाळी 9 ते रात्री 9 दुकाने आता खुली राहणार ग्रंथालय  खुली करण्यात येणार मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यक्रम अद्याप ही परवानगी नाही आठवडी बाजार सुरू होऊ शकतात, परंतु, कंटेनमेंट झोन शिवाय इतर ठिकाणी आठवडा बाजार आता सुरू होणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या