JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत शरद पवाराचं मोठं विधान, म्हणाले...

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत शरद पवाराचं मोठं विधान, म्हणाले...

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी उतावीळ झाले आहेत. आता आमदारांची फोडाफोडी केली तर जनता त्यांना झोडल्याशीवाय राहणार नाही.’

जाहिरात

Mumbai: Senior Congress leader Mallikarjun Kharge, NCP chief Sharad Pawar and Shiv Sena President Uddhav Thackeray along with NCP, Congress and Shiv Sena MLAs during a gathering to display their strength of 162, at Grand Hyatt Hotel in Mumbai, Monday, Nov. 25, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_25_2019_000248B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 मे: राज्यात कोरोनाचं संकट गंभीर असतानाच राजकीय हालचालींना वेग आलाय. महाविकास आघाडीचे आधारस्तंभ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली राज्यपालांची भेट. त्यानंतर मातोश्रीवर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली कथित भेट. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची व्यक्त केली जात असलेले शंका या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार स्थिर असून त्यांना धोका नाही असा खुलासा शरद पवार यांनी एनडीटीव्ही शी बोलताना केला. पवार म्हणाले, राज्यपालांची घेतलेली भेट ही शिष्टाचार भेट होती. त्याला राजकीय रंग दिला जाऊ नये. त्यांनी दोन तीनवेळा चहाचं निमंत्रण दिलं. त्यामुळे भेट घेतली. राज्यातलं सरकार स्थिर आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी उतावीळ झाले आहेत. आता आमदारांची फोडाफोडी केली तर जनता त्यांना झोडल्याशीवाय राहणार नाही. ते पुढे म्हणाले, मी आणि उद्धव ठाकरे हे वारंवार भेटत असतो. नेहमी आम्ही महापौरांच्या बंगल्यावर भेटत असतो. यावेळी मातोश्रीवर भेटण्याचं ठरलं होतं. त्यात वेगळं असं काहीच नाही. सरकार कोव्हिड व्हायरसचा चांगल्या पद्धतीने मुकाबला करत असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘मातोश्री’वर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुप्त बैठक झाली. परंतु, भाजपचे नेते नारायण राणे यांनी मात्र, अशी बैठक झालीच नाही, असा दावा केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार हे सोमवारी संध्याकाळी  ‘मातोश्री’वर गेलेच नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत अशी कोणतीही बैठक झालीच नाही, असंही ते म्हणाले होते. महाविकास आघाडी सरकार अस्थिर? थोरातांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

 तसंच,  ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्षं टिकणार नाही.   कोरोनाला रोखण्यात सरकार सपशेल अपयशी त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लावली पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केली.

‘काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे. त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणत आहे’, असा टोलाही राणेंनी लगावला. विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि महापालिकेच्या तावडीतील सर्व रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र, म्हणाले…

 आता शरद पवारांनीच उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असा खुलासा केल्याने पवार ठाकरे भेट झाली की नाही या वादावर पडदा पडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या