JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / सुप्रिया सुळेंनी केली योद्धा @80 शॉर्टफिल्म स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा, कोणी पटकावला प्रथम क्रमांक? पाहा सर्व VIDEO

सुप्रिया सुळेंनी केली योद्धा @80 शॉर्टफिल्म स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा, कोणी पटकावला प्रथम क्रमांक? पाहा सर्व VIDEO

शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ‘योद्धा@80’ शॉर्टफिल्म/डाक्युमेंटरी फिल्म स्पर्धा 2020 चे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 डिसेंबर : राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ‘योद्धा@80’ शॉर्टफिल्म/डाक्युमेंटरी फिल्म स्पर्धा 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातून तीनशेहून अधिक संघांनी सहभाग नोंदविला. ‘ही शॉर्टफिल्म स्पर्धा शरद पवार यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीची माहिती लघुपटाच्या अथवा माहितीपटाच्या माध्यमातून तरूण पिढीपर्यंत पोहोचावी व फिल्म मेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक-युवतींकडून साहेबांच्या कारकिर्दीवर चांगल्या कलाकृतींची निर्मिती व्हावी, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश होता,’ असं टीम ‘योद्धा@80’ कडून सांगण्यात आलं आहे. तसंच या स्पर्धेतील विजेत्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. ‘या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त फिल्म आपणा सर्वांना बघण्याकरिता आम्ही उपलब्ध करून देत आहोत, तेव्हा आजच्या नव्या दमाच्या कलावंतांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेल्या या फिल्मरूपी शुभेच्छा नक्की बघा आणि या लिंक्स सर्वांसोबत शेअर करा,’ असं आवाहनही या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या टीमकडून करण्यात आलं आहे. कोण आहेत शरद पवारांच्या कारकिर्दीवर आधारित शॉर्टफिल्म स्पर्धेचे विजेते? प्रथम क्रमांक फिल्म आकाश मनोहर फुके, पुणे https://youtu.be/88hHSKMo1Po

द्वितीय क्रमांक फिल्म कल्याणी राजेश शिंदे, बीड

तृतीय क्रमांक फिल्म सात्विक वेळसकर, डोंबिवली

विशेष परितोषिक विदर्भ विभाग अभिजित बाबाराव साबळे, अमरावती https://youtu.be/UEJIEnpFHno मराठवाडा विभाग (विभागून) डॉ. गणेश मदनराव शिंदे, परभणी https://youtu.be/Dx2qNcghvck मराठवाडा विभाग (विभागून) आकाश पंडित वहाटूळे, मंगेश लोखंडे, औरंगाबाद https://youtu.be/ZFaCKp1lY2U कोंकण विभाग दिलीप आंब्रे, रत्नागिरी https://youtu.be/aOB3zEC6RDw मुंबई एमएमआरडीए विभाग प्रमोद पवार, ठाणे https://youtu.be/Y5FSFSZobd0 उत्तर महाराष्ट्र विभाग हर्षवर्धन एम. वैराळ, अभिषेक ए. शिंदे , अहमदनगर https://youtu.be/XlUQMyAj4MQ पश्चिम महाराष्ट्र विभाग विनोद गोपाल दुसाने, पुणे https://youtu.be/sT-QhmFgQzc एलजीबीटी विभाग अभयसिंह काळभोर, सातारा https://youtu.be/hzHwVUZFL-4 महिला दिग्दर्शक (कोकण विभाग ) राधिका संजय गुंजाळ, रायगड https://youtu.be/PWm3agOhesA महिला दिग्दर्शक (पश्चिम महाराष्ट्र) स्वाती राउत क्षीरसागर, पुणे https://youtu.be/bk2eQKQXx1Y महिला दिग्दर्शक (मराठवाडा ) हेमा पिंपळे, बीड https://youtu.be/dDL4MoUYSHo माहितीपट सोनाली विठ्ठल शिंदे, नवी मुंबई https://youtu.be/EWKswDm9L_Y माहितीपट योगेश पोपटराव सारगंधर, औरंगाबाद https://youtu.be/-tpAsXK53Fs माहितीपट डॉ. सुरैना निलेश मल्होत्रा, मुंबई https://youtu.be/JSpR98p-KIo

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या