JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मानले साहेब! कार्यकर्ते झोपले बेडवर, तर आमदारांनी जमिनीवर अंथरली सतरंजी

मानले साहेब! कार्यकर्ते झोपले बेडवर, तर आमदारांनी जमिनीवर अंथरली सतरंजी

दमून झोपलेल्या कार्यकर्त्याला काय उठवायचे असा विचार करून लंके यांनी जमिनीवरच सतरंजी टाकली आणि तिथेच ते झोपी गेले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 09 मार्च : मुंबईतलं आमदार निवास हे मतदारसंघातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हक्काची जागा असते. कुणी शिक्षणासाठी, कुणी आजारी नातेवाईकाला घेऊन तर कुणी रोजगारासाठी मुंबईत येत असतात. या मायानगरीत राहणं हे सामान्यांच्या आवाक्यातलं नाही. त्यामुळे गावाकडून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या आमदांराची खोली हे हक्काचं घर असतं. प्रत्येक आमदारांना मुंबईत राहण्यासाठी आमदार निवासात एक फ्लॅट दिला जातो. त्यात किमान दोन खोल्या आणि लहानसं स्वयंपाकघर असतं. कार्यकर्त्यांनी त्या खोल्या कायम हाऊल फुल्ल असतात. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या फ्लॅटमधला असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात आमदारांच्या बेडवरही कार्यकर्ते झोपल्याचं दिसत असून रात्री थकून घरात आलेल्या आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना न उठवता खाली सतरंजी टाकली आणि तिथेच ताणून दिली. आमदार लंके यांना आकाशवाणी आमदार निवासात 109 क्रमांकाची खोली मिळाली आहे. त्या खोलीत कायम पारनेर या त्यांच्या मतदारसंघातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा राबता असतो. हे वाचा -  आदित्य यांच्यावर वॉच ठेवणार अमित ठाकरे त्याचं झालं असं की घटनेच्या दिवशी आमदार लंके सर्व शासकीय बैठका आणि जेवण आटोपून खोलीवर आले होते. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. खोलीत कार्यकर्ते झोपले होते. गर्दी असल्याने एका कार्यकर्त्याने चक्क त्यांच्या बेडवरच जाऊन ताणून दिली होती. दमून झोपलेल्या कार्यकर्त्याला काय उठवायचे असा विचार करून लंके यांनी जमिनीवरच सतरंजी टाकली आणि तिथेच ते झोपी गेले. हे वाचा - ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, राज ठाकरेंनी दिला इशारा सकाळी उठल्यानंतर कार्यकर्त्यांना याचं आश्चर्य वाटलं. आपल्या आमदारांचा साधेपणा पाहून ते भारावून गेले. तर आमदारांना याचं फारसं काहीच वाटलं नाही. कार्यकर्ते थकून भागून येतात. त्यांना उठवायचं कशाला असा विचार करून मी झोपी गेलो असं लंके यांनी सांगितले. त्यांच्या या खोलीतला फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला असून लंके यांच्या साधेपणाचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या