मुंबई, 12 ऑक्टोबर : ‘तुमच्या प्रदेशाध्यक्षांना शरद पवार यांच्यावर पीएचडी करायला जमलं नाही तर तुम्हाला शरद पवार समजायला सात जन्म घ्यावे लागतील’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपचे नेते अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली होती. त्यांच्या टीकेचा समाचार घेत महेश तपासे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मध्यरात्री अज्ञातांनी बसवला शिवरायांचा पुतळा, कोल्हापुरातील बांबवडेमध्ये तणाव ‘तुम्ही भाजपाच्या सत्तेत कृषीमंत्री होतात मग शेतकर्यांना काय दिले, याचे आत्मपरीक्षण करावे. शरद पवार यांच्यावर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषीमंत्री असताना काय दिवे लावले ते आधी पाहावे, असा टोला महेश तपासे यांनी अनिल बोंडे यांना लगावला. ‘अनिल बोंडे, तुमच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना शरद पवार यांच्यावर पीएचडी करायला जमलं नाही, तर तुम्हाला शरद पवार समजायला सात जन्म घ्यावे लागतील’, असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे. झुंज संपली, कोरोनाशी दोन हात करताना सुरेखा महाडिक यांचे निधन तसंच ‘शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी एका झटक्यात केली होती. तुम्ही मात्र तत्वत: आणि नियम अटी टाकून शेतकर्यांना झुंजवत राहिलात, अशी टीकाही त्यांनी केली. काय म्हणाले होते अनिल बोंडे ? ‘शरद पवार हे पलटी मारणारे नेते आहेत. त्यांनी तर आत्मचरित्रात लिहलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या नियमनमुक्त झाल्या पाहिजेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांचं सरकार असताना शेती उत्पादनाचा कायदा केला. मग आता ते खोटं का बोलत आहेत?,’ असा सवाल अनिल बोंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केला होता. तसंच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था गझनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाली आहे. दिलेली आश्वासने आता त्यांना आठवत नाहीत का? असा टोमणाही अनिल बोंडे यांनी मारला होता.