JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / कोरोना रुग्णांना लुबाडणाऱ्या नामांकित रुग्णालयाला BMC चा दणका; FIR दाखल

कोरोना रुग्णांना लुबाडणाऱ्या नामांकित रुग्णालयाला BMC चा दणका; FIR दाखल

अनेक खासगी रुग्णालयांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जुलै : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पालिकेकडून रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मात्र अनेक खासगी रुग्णालयांत रुग्णांची लूट सुरू असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यात पालिकेने आता यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

मुंबईतील नामांकिंत नानावटी रुग्णालयावर पालिकेने कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील विलेपार्लेतील नानावटी रुग्णालयाविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतले आहे. कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मिररने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे वाचा- Good News: एका दिवसात 8018 जणांना डिस्चार्ज, रुग्ण संख्येने ओलांडला लाखाचा टप्पा वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर श्रीराम कोरोगावार यांनी सांगितले की 1 जुलै रोजी रामचंद्र कोब्रेकर  (Assistant Auditor at the BMCs K-West Ward) यांनी नानावटी विरोधात एफआयआर दाखल केली आहे. रुग्णालयाकडून पीपीई किट्स, औषधं आणि कोरोना चाचणीसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात होते, असे सांगितले जात आहे. रुग्णालयाकडून याबाबतचा तपास सुरू आहे. त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर बातमी अपडेट केली जाईल. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या