JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Rain : ऑफिसहून घरी निघत असाल तर, मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची लोकल ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai Rain : ऑफिसहून घरी निघत असाल तर, मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची लोकल ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये धुवाधार पाऊस पडत आहे, यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे.

जाहिरात

अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जुलै : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये धुवाधार पाऊस पडत आहे, यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. सततच्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे, त्यामुळे सीएसएमटीहून डाऊन दिशेकडे जाणारी आणि अप दिशेकडे येणाऱ्या सर्व लोकल रेल्वे वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्यात येत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा आधीच बंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामातही अडथळे निर्माण झाले आहेत. बदलापूर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं. अनेक विद्यार्थी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडले होते, त्यांना स्थानिकांनी दोरीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढलं आहे. ‘गावावर आलेलं विघ्न दूर कर’ रायगडातील ग्रामस्थांनी अर्धवट बुडालेल्या गणपतीची केली पूजा; पाहा Video बाळ वाहून गेलं अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशनदरम्यान दोन तास थांबली होती, त्यामुळे काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते, त्यावेळी छोटं बाळ घेऊन एक व्यक्ती आणि बाळाची आई जात होते, तेव्हा अचानक या व्यक्तीच्या हातातून चार महिन्यांचं बाळ निसटलं आणि वाहत्या पाण्यात गेलं. दुपारी 2 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. पावसाचा हाहाकार! खेडला महापुराचा विळखा, 12 हजार घरं अंधारात; 64 गावांचा संपर्क तुटला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या