विजय वंजारा(मुंबई) : मुंबई उपनगरातील दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका चोराला अटक केली आहे. जो एटीएम मशिनमध्ये चिप टाकून एटीएममधून पैसे काढायचा. दिंडोशी पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. त्याने आतापर्यंत शेकडो लोकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास केले असल्याची कबुली दिली आहे. हा आरोपी मशिन खराब झाल्याची बतावणी करायचा, पैसे काढणारी व्यक्ती एटीएममधून बाहेर पडायची, त्यावेळी तिथे उपस्थित आरोपी एटीएममध्ये घुसून पट्टी काढून पैसे काढायचा पोलिसांनी आरोपींकडून 11 प्लास्टिकच्या पट्ट्या, कात्री, फेविस्टिक आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
हे ही वाचा : आणखी एक हादरवणारं कांड! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले अन्…, धक्कादायक कारण समोर
मिळालेल्या महितीनुसार, 4 जानेवारी रोजी दिंडोशी पोलीस ठाण्याचे बिट मार्शल रामदास देविदास बुरडे गस्त घालत होते. दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दफ्तरी रोड मालाड, खाऊ गल्ली, मालाड पूर्व स्टेशनजवळ गस्त घालत असताना त्यांना एसबीआयजवळ एक संशयित व्यक्ती उभ्या असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी पोलीस हवालदार रामदास यांनी घटनास्थळ गाठून आरोपीवर नजर ठेवली. आरोपी एटीएम मशिनच्या आत जाताच त्याने एटीएम मशिनमध्ये पैसे टाकलेल्या ठिकाणी प्लास्टिक टाकण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी मागून जाऊन त्याला प्लास्टिकची पट्टी लावताना रंगेहात पकडले. चौकशीत आरोपीने सांगितले की, तो एटीएम मशिनच्या कॅश ड्रॉवरच्या बाहेर प्लास्टिकची पट्टी चिकटवून मशिनमधून येणारे पैसे थांबवत असे. पैसे काढणारा मशिनमध्ये बिघाड झाल्याचा विचार करून निघून जात असे, आरोपी एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सुमारे 4 महिन्यांपासून अशा एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचे काम करत होता.
दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय जीवन खरात यांनी सांगितले की, आरोपी पवन अखिलेश पासवान (३५) हा बिहारचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रिकल तज्ञ आहे. बऱ्याच दिवसांपासून हा आरोपी मालाडच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढत होता. पोलिसांच्या गस्तीदरम्यान ही माहिती मिळाली. कॉन्स्टेबलने आरोपी पवनला रंगेहात पकडले. आरोपी पवन पासवान याच्यावर वसई पोलीस ठाण्यातही एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
हे ही वाचा : रात्री पतीसोबत जेवण केलं, मग फोनवर बोलली अन्…; प्रेमविवाहानंतर दीड वर्षातच विवाहितेचा टोकाचा निर्णय
या चांगल्या कामाबद्दल मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी कौतुक पत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. दरम्यान रामदास बुरडे यांचा उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांनीही गौरव केला आहे.