JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई: गर्भपाताचा प्रयत्न करूनही झाला मुलीचा जन्म; निर्दयी आईनं केला 2 महिन्यांच्या चिमुकलीचा सौदा

मुंबई: गर्भपाताचा प्रयत्न करूनही झाला मुलीचा जन्म; निर्दयी आईनं केला 2 महिन्यांच्या चिमुकलीचा सौदा

Crime in Mumbai: मुंबईतील कामोठे परिसरातील एका महिलेनं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर: मुंबईतील कामोठे परिसरातील एका महिलेनं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिला आपल्या बाळाला विकणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. कामोठे पोलिसांनी आरोपी आईसह एक स्त्री रोगतज्ज्ञ आणि अन्य दोन महिलांना अटक केली आहे. संबंधित सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. आरोपींनी यापूर्वी देखील अशाप्रकारे नवजात बालकांच्या विक्रीचे व्यवहार केल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. अमरीन बानो बदर बक्श असं अटक करण्यात आलेल्या आईचं नाव आहे. आरोपी अमरीन यांना चार मुलं आणि एक मुलगी आहे. पाचवी मुलगी पोटात असताना, आरोपी महिलेचा पती तिला वाऱ्यावर सोडून निघून गेला होता. त्यामुळे अमरीन यांनी गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी अमरीन यांनी मुलीला जन्म दिला. पण घरी उत्पन्नाचं कोणतंच साधन नसल्याने चार मुलांचा साभांळ कसा करायचा? हा प्रश्न अमरीन यांना सतावत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या लेकीला विकण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. हेही वाचा- …अन् मृत्यूच्या दाढेतून पतीला आणलं परत; शुद्धीवर येताच अश्रूंचा फुटला बांध आरोपी आई आपल्या बाळाला विकणार असल्याचं कळताच स्त्रीरोग तज्ज्ञ संजय पाटील हा मदत करण्यासाठी तयार झाला. पण पोलिसांनी या व्यवहाराचा सुगावा लागल्याने पोलिसांनी मंथन पाटील या महिलेला ग्राहक म्हणून पाठवलं. यानंतर आरोपींनी नवजात मुलीचा 4 लाखांत सौदा केला. यातील अडीच लाख रुपये संजय पाटील याला , एक लाख रुपये अमरीनला तर उर्वरीत रक्कम सहकारी महिला रजनी जाधव आणि रुख्सार शेख यांना मिळणार होती. हेही वाचा- नगरमध्ये विवाहितेवर दोनदा गँगरेप; नराधमांनी हात-पाय बांधून दिल्या नरक यातना अमरीन आपल्या मुलीला विकण्यासाठी आली असता, सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी आरोपी महिलेला रंगेहाथ अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी स्त्रीरोग तज्ज्ञ संजय पाटील आणि सहकारी महिला रजनी जाधव आणि रुख्सार शेख यांना जेरबंद केलं आहे. संबंधित सर्व आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या