JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आता रात्रीही करा Enjoy, मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरू

आता रात्रीही करा Enjoy, मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरू

‘24 तास हॉटेल्स सुरू ठेवण्याचा विचार सध्या तरी केवळ मुंबई पुरता आहे. पण पुण्यासारख्या शहरांनी तसा प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत विचार केला जाईल. '

जाहिरात

Mumbai: Bolts of lightning flash across the sky during thunderstorm and rain over the suburbs, in Mumbai, late Monday, June 10, 2019. (PTI Photo/Neel Geelani) (PTI6_11_2019_000037B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जानेवारी : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणजेच मुंबई 24 तास खुली ठेवणं. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरु झालीय. आता रात्रभर मुंबईच्या काही भागातली हॉटेल्स, मॉल्स आणि खाऊ गल्ल्या सुरू राहणार आहेत. आत्तापर्यंत जीवाची मुंबई करण्यासाठी लोक येत, आता जेवायची मुंबई करण्यासाठी लोक येतील अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय. यामुळे मुंबईची आर्थिक उलाढालही वाढेल असंही ते म्हणाले. मुंबई पोलीस आणि बेस्टने यासाठी खास उपायोजनाही केल्या आहेत. तरुणाईने या निर्णयाचं स्वागत केलंय. सरकारने अरहिवासी भाग असलेल्या जागांमध्ये जे मॉल्स आणि हॉटेल्स आहेत त्यांना 24 तास दुकाने खुली ठेवण्याची परवानगी दिलीय. मात्र पब आणि बारसाठीची वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. त्यात बदल होणार नाही असंही सरकारने सांगितलंय. नाईट लाईफमुळे येत्या तीन वर्षांत किमान ५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल असा अंदाज राज्य सरकरारने व्यक्त केलाय. या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे मासिक उत्पन्न किमान १० हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. राज्य सरकारचा हा निर्णय यशस्वी झाल्यास मुंबईत २०% रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पोलिसांनी सुरक्षेसाठी खास फिरती पथकं तयार केली आहेत. तर बेस्ट पहाटे 4 पर्यंत एसी बसेस चालवणार आहे. सुरुवातीचे काही दिवस आढावा घेतल्यानंतर बेस्ट 24 तास आपली सेवा सुरू ठेवण्याचा विचार करत आहे.  24 तास हॉटेल्स सुरू ठेवण्याचा विचार सध्या तरी केवळ मुंबई पुरता आहे. पण पुण्यासारख्या शहरांनी तसा प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत विचार केला जाईल. असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही 2013 मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. काका पवारांच्या ‘आखाड्या’त अजित पवारांची फटकेबाजी ‘नाईट लाईफ नाही…ही तर किलींग लाईफ’ ‘ही नाईट लाईफ नसून किलींग लाईफ आहे. कमला मिल येथे आग लागली त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाईट लाईफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?’ असा सवाल करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

छेड काढणाऱ्या ‘रोमियो’च्या गालात तिने लगावली थप्पड, आणि…

‘मोठ्या भ्रष्टाचाराची सुरूवात नाईट लाईफ माध्यमातून होईल. कमला मिल आग लागली होती. अतिरिक्त एफएसआय घोटाळा झाला. हा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी नाईट लाईफचा निर्णय घेऊन टुरिझमच्या नावाखाली पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी महापालिका आणि सरकार करत आहे,’ असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या