JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / दुकान भाड्यानं घेतल्याचा राग मनात ठेवून मुंबईत भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

दुकान भाड्यानं घेतल्याचा राग मनात ठेवून मुंबईत भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

Mumbai Crime News: भाजीविक्रेत्याला (Vegetable Seller) बेदम मारहाण (beaten) केल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट: मुंबईतल्या मांटुगा (Matunga) भागात एका भाजीविक्रेत्याला (Vegetable Seller) बेदम मारहाण (beaten) केल्याची घटना घडली आहे. ही मारहाण सीसीटीव्ही (Cctv Footage) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जाणून घेऊया नेमकी घटना हा व्हिडिओ 22 ऑगस्टचा आहे. सकाळी 8.30 च्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी सुरुवातीला पीडित विक्रेत्याच्या दुकानावर येतात. काही वेळ बोलल्यानंतर एक आरोपी पीडिताच्या दुकानात शिरतो आणि बघता बघता त्याला मारहाण करण्यास सुरुवात करतो. त्यानंतर घटनास्थळावरुन तिन्ही आरोपी फरार होतात.

संबंधित बातम्या

उदय कुमार नाडर, बाळकृष्ण नाडर आणि रमेश अशी आरोपींची नावं आहे. या तिघांना भाजीविक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. बायकोच्या घरच्यांचा त्रास सहन न झाल्यानं तरुणाची आत्महत्या, CMकडे केली ही मागणी उदय नाडर यानं सुरुवातीला हे भाजीचं दुकानं भाडेतत्त्वार घेतलं होतं आणि पीडित त्याच्याच दुकानात काम करत होता. मात्र लॉकडाऊनमध्ये दुकान चालत नव्हतं. याच दरम्यान पीडित तरुणानं दुकान मालकांशी बोलून स्वतःच दुकान भाड्यावर घेतलं. ज्यामुळे आरोपी उदय नाराज झाला आणि त्यानं आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर पीडितानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. माटुंगा पोलिसांनी भादंविच्या कलम 452,324,506 (2) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या