JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 13 वर्षीय भावाला PORN VIDEO दाखवायची बहिण; पुढे जे घडलं त्यानं मुंबई हादरली

13 वर्षीय भावाला PORN VIDEO दाखवायची बहिण; पुढे जे घडलं त्यानं मुंबई हादरली

Crime in Mumbai: मुंबईतील कुरार परिसरात भाऊ आणि बहिणीच्या नात्याला कलंक फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात

शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि...

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट: मुंबईतील (Mumbai) कुरार परिसरात भाऊ आणि बहिणीच्या नात्याला कलंक फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपल्या 13 वर्षीय भावाला अश्लील व्हिडीओ (Sister shows Porn Videos to brother) दाखवून त्याला लैंगिक संबंध (Forced to have sexual relation) ठेवण्यास भाग पाडलं आहे. संबंधित तरुणी 5 महिन्यांची गर्भवती (pregnant of 5 months) राहिल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. संबंधित मुलीवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला अश्लील व्हिडीओ पाहण्याचं व्यसन होतं. ती आपल्या लहान भावासोबत कॉटखाली झोपायची, दरम्यान ती आपल्या मोबाईलवर 13 वर्षीय भावाला अश्लील व्हिडीओ दाखवायची. त्यानंतर ती आपल्या भावावर दबाब टाकून त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची. मागील बऱ्याच दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. यातूनच 16 वर्षीय तरुणी गर्भवती राहिली आहे. गर्भवती राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हेही वाचा- बारावीतील विद्यार्थिनीवर मित्रांकडूनच गँगरेप याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावाचीही चौकशी केली असून त्यानं बहिणीच्या जबाबात तथ्य असल्याचं सांगितलं आहे. पीडित भावानं पोलिसांना सांगितलं की, जेव्हा तो लैंगिक संबंध ठेवण्यास नकार द्यायचा, तेव्हा त्याची बहिण त्याला मारहाण करण्याची आणि घटनेची वाच्यता करण्याची धमकी द्यायची. त्यामुळे बहिणीच्या धमकीला बळी पडून तो बहिणीसोबत अश्लील कृत्य करण्यास तयार व्हायचा. हेही वाचा- नवऱ्यानंतर आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट दोघा बहिण भावाचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित अल्पवयीन भावाला बाल सुधारगृहात पाठवलं आहे. तर संबंधित तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलीस सध्या आई वडिलांची डीएनए चाचणी करत आहे. डिएनचा रिपोर्ट आल्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या