जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.
मुंबई, 22 जून : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोना घुसला आणि प्रशासन, सरकारची चिंता वाढली. कारण दाटीवाटीच्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे अशक्यच होतं. मात्र जे शक्यही वाटत नव्हतं ते प्रत्यक्षात झालं. धारावीत कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवता आला. पण आता झोपडपट्टी परिसर नव्हे तर बहुमजली इमारतींनी चिंता वाढवली आहे. कारण धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आता उच्चभ्रू वस्तीतील इमारती कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मुंबईतील नेपीएसी रोडवरील तानही हाइट्स इमारतीत 21 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. या इमारतीच्या सर्व रहिवाशांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर जवळील सुभाष बिल्डिंगलाही क्वारंटाइन केलं गलं आहे. या इमारतीतह काही कोरोना रुग्ण आहेत. परिसरातील फेरिवाल्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय मोलकरीण आणि ड्रायव्हर्सनाही बंदी घालण्यात आली आहे. हे वाचा - बापरे! मुंबईत पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार, आयुक्तांनी दिला इशारा फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार, “पालिकेच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर दक्षा शाह यांनी सांगितलं, बीएमसीने इमारती सील करण्याबाबत सविस्तर निर्देश जारी केलेत. एकदा बिल्डिंग किंवा मजला सील केल्यानंतर पुढील जबाबदारी हाऊसिंग सोसायटीची असते. कंटेन्मेंट झोनमधून कुणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये, याची खबरदारी सोसायटीनेच घ्यायची असते” सोसायटी नियमांचं पालन करत नसल्याने प्रकरणं वाढत असल्याचं सांगितलं जातं आहे. “उच्चभ्रू वस्तीतील लोकांना आम्ही जबाबदारीने वागायला सांगितलं आहे. कारण हाऊस हेल्पर आणि ड्रायव्हरही पॉझिटिव्ह निघाले आहेत. लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावं”, असं आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे. मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट मुंबईत आता धारावी नवे तर दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, भांडुप, मुलुंड हे कोरोनाव्हायरसचे नवे हॉटस्पॉट झालेत. इथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या नवीन हॉटस्पॉटमध्ये आता रॅपिड अकॅशन प्लॅन पूर्णपणे लागू केला जाणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता एकूण 132075 कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 60147 सक्रिय रुग्ण आहेत. तर 65744 रुग्ण बरे झालेत त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. रविवारी 3870 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1591 रुग्ण बरे झाले. संपादन - प्रिया लाड हे वाचा - COVID-19: पोलिसांवर कोरोनाचं संकट, 24 तासांत 55 जवानांना बाधा; संख्या गेली 4,103