JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Local: मुंबईचा समावेश लेवल 1 मध्ये; लोकल ट्रेन सुरू होणार? पाहा मनपाने काय म्हटलं

Mumbai Local: मुंबईचा समावेश लेवल 1 मध्ये; लोकल ट्रेन सुरू होणार? पाहा मनपाने काय म्हटलं

Mumbai Local train updates: मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण मुंबईचा समावेश आता लेवल एकमध्ये झाला आहे. पण लोकल ट्रेनबाबत काय निर्णय झाला?

जाहिरात

स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून: राज्यातील कोविड (Covid19) रुग्णसंख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे. त्यानुसार आता ताज्या आकडेवारीनुसार मुंबईचा (Mumbai) समावेश आहे पहिल्या स्तरात झाला आहे. पहिल्या स्तरातील परिसरात सर्व निर्बंध हटवण्यात येतात. त्यामुळे आता मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सर्वांसाठी सुरू होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबई जरी लेवल 1 मध्ये आली असली तरी निर्बंध मात्र सध्याचेच लेवल तिनचेच राहतील. पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय उद्यापर्यंत घेवू. सर्व गोष्टींचा विचार करून टप्याटप्याने निर्बंध दूर केले जातील.

संबंधित बातम्या

पॉझिटिव्हीटी रेटनुसार तुमचा जिल्हा कोणत्या स्तरात, जाणून घ्या या आठवड्याची संपूर्ण आकडेवारी लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू होणार? मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं, “तज्ञांनी दोन चार आठवड्यांत तिसरी लाट येईल, असा अंदाज दर्शवला आहे. त्यामुळं त्याची पूर्वतयारी करायचीय व अधिक सतर्कता बाळगायची त्यामुळं लोकल प्रवासासाठी अधिक कळ सोसावी लागेल.” मुंबईचा विचार करतो तेव्हा मुंबईच्या आसपासच्या परिसराचा विचार करणं आवश्यक आहे. मुंबईत बाहेरून येणारी लोकसंख्या, झोपडपट्टीतील लोकसंख्या, दाटीवाटी या सर्वांचा विचार करून आपण टप्प्याटप्प्याने अनलॉकची पद्धत अवलंबवली तर बरं होईल असंही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या