JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आईचा कोरोनामुळे मृत्यू; रुग्णालय प्रशासन मुलाला म्हणालं, पोतडीत घेवून जा मृतदेह

आईचा कोरोनामुळे मृत्यू; रुग्णालय प्रशासन मुलाला म्हणालं, पोतडीत घेवून जा मृतदेह

देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यात मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असताना महानगरपालिकेच्या एका रुग्णालयाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जाहिरात

गेल्या 3 महिन्यात रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूदरदेखील 3 पटीने वाढला असून 680000 पर्यंत पोहोचला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जुलै: देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यात मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असताना महानगरपालिकेच्या एका रुग्णालयाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बोरिवली येथील मुंबई महापालिकेच्या (BMC)शताब्दी रुग्णालय प्रशासनानं 21 वर्षीय मुलाला विना पीपीई किट आईचा मृतदेह पोतडीत ठेवण्यास भाग पाडलं. या घटनेनंतर रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. हेही वाचा… लॉकडाऊन आणखी किती दिवस? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे सरकारला सवाल मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील बोरिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडली. मृत महिलेचा मृतदेह पोतडीत ठेवण्यास तिच्या मुलाला रुग्णालय कर्मचाऱ्यांनी भाग पाडलं. मुलानं मागितली पीपीई किट, पण.. मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तनुसार, घर काम करणाऱ्या 50 वर्षीय पल्लवी उटेकर यांना 30 जूनला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. मात्र, 2 जुलैला पल्लवी उटेकर यांचा मृत्यू झाल्याचा मुलगा कुणाल उटेकर याला रुग्णालयातून फोन आला. कुणाल तातडीने रुग्णालयात पोहोचला. रुग्णालय कर्माचाऱ्यांनी कुणालला त्याच्या आईचा मृतदेह पोतडीत ठेवण्यास सांगितलं. कुणालने पीपीई किटची मागणी केली, पण त्याला स्पष्ट नकार देण्यात आला. एवढंच नाही कुणाल कोविड वार्डात विना सिक्युरिटी गेला. आईचा मृतदेह प्लास्टिक पोतडीत पॅक केला. काय म्हणालं रुग्णालय प्रशासन? ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बीएमसी शताब्दी रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद नागरकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हेही वाचा..अ क्षयकुमारचा ‘तो’ नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात, भुजबळ यांनी दिले चौकशीचे आदेश कुणाल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचं मातृछत्र हरपलं आहे. बोरीवली येथील गोखले कॉलेजमध्ये तो बीकॉम थर्ड ईअरचा स्टूडेंट आहे. कुणालचे 55 वर्षीय वडील पांडुरंग उटेकर हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना बीएमसीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या