"मोहित भारतीय आणि समीर वानखेडेंचे नशीब चांगले की 'तो' CCTV बंद होता" : नवाब मलिक
मुंबई, 7 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise drug party case) नवा गौप्यस्फोट केला आहे. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपचे मोहित कम्बोज (भारतीय) (Mohit Bhartiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणाले, आम्ही सांगितलं होतं की मोहित कंबोज (भारतीय) आणि समीर वानखेडे यांचे संबंध आहेत, लवकरच यांच्या मिटिंगचे व्हिडीओ प्रसिद्ध करु. नशिब यांचे चांगले आहेत. एका कब्रस्थान संदर्भात वानखेडे साहेब बोलत होते की, कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहेत. माझी 6 ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाली. त्यानंतर 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांची कब्रस्थानाच्या बाहेर भेट झाली. आम्ही पाहत होतो की, तेथील सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती लागेल. तेथील नागरिकांनी मला माहिती दिली की, एक गाडी आली होती त्यात काही बॉडिगार्ड्स होते. एक दाढीवाला व्यक्ती त्यांना भेटला होता. यांचे नशीब चांगले आहेत पोलिसांचा त्या परिसरातील सीसीटीव्ही बंद होता त्यामुळे त्या मिटिंगचा सीसीटीव्ही व्हिडीओ आम्हाला मिळाला नाही असं नवाब मलिक म्हणाले. वाचा : आर्यन खानसोबत किरण गोसावीने काढलेल्या Selfie मुळे 18 कोटींची डील फसली, विजय पगारेंच्या दाव्याने खळबळ समीर वानखेडे घाबरले आणि ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले की कुणीतरी माझा पाठलाग करत आहे. प्रायव्हेट आर्मीचा कंबोज हा सुद्धा एक प्लेअर आहे. समीर वानखेडेंचा एकच धंदा आहे शहरात ड्रग्जचा कारोबार सर्रास सुरू राहिला पाहिजे. ड्रग्ज प्रकरणातील माफियांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल. ड्रग्स माफीयांकडून पैसे उकळण्याचा यांचा उद्देश आहे असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे. नवाब मलिकांचा खळबळजनक दावा आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मोहित भारतीय आहे असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेलं. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज (भारतीय) हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं.