JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मनसेसैनिकांची मोहिम फत्ते, अशी गाठली लोकल, दुसरा VIDEO

मनसेसैनिकांची मोहिम फत्ते, अशी गाठली लोकल, दुसरा VIDEO

संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी गनिमी कावा करत लोकलमध्ये प्रवेश करून प्रवास केला. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 सप्टेंबर : मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. अखेर पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन यशस्वी केले आहे. मनसेसैनिकांनी गनिमी कावा पद्धतीने लोकल स्टेशन गाठले. जेव्हा स्टेशनवर लोकल येऊन थांबणार होती, तेव्हाच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी स्टेशनवर धावत जाऊन लोकल पकडली. त्यानंतर पुढे लोकलने प्रवास पूर्ण केला.

संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी गनिमी कावा करत लोकलमध्ये प्रवेश करून प्रवास केला. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसेने केली होती. लोकल सेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना एसटी बस किंवा खासगी गाड्याने प्रवास करावा लागत आहे. ठाणे, वसई, विरार, डोंबिवली, बदालपूर, अंबरनाथ भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना मुंबईत यावे लागते. पण लोकल सेवा बंद असल्यामुळे चार-चार तासांचा प्रवास करून बसने प्रवास करून ऑफिस गाठावे लागत आहे. काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाच नसल्यामुळे चाकरमान्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. परंतु, मुंबईतील लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असल्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या