'राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यांची भूमिका ही उत्तर भारतीयांना पटलेली आहे'
मुंबई, 05 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतल्यामुळे मनसेनं (mns) भूमिका कशी बदलली अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे, मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झालाय आणि मेट्रो सिटी असल्यामुळे परप्रांतींयाचे सुद्धा या मध्ये योगदान आहे’ असा दावाच मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार (mns leader yashwant killedar) यांनी केला आहे. राज ठाकरे जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच उत्तर प्रदेशला यावे अशी अट भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी घातली आहे. त्यांच्या या आव्हानाला यशवंत किल्लेदार यांनी उत्तर देतानाच परप्रांतीयांचं कौतुक केलं. ( कोणीही रोखू शकणार नाही तुमची प्रगती; करिअरमध्ये ‘या’ चांगल्या सवयी असणं आवश्यक ) भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह हे खूप भावनिक झाले आहेत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचा आदर करतो. पण राज ठाकरे यांचा दौरा हा आधीच ठरला आहे. नियोजित वेळेप्रमाणे दौरा पार पडणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर बोलून प्रक्रिया पार पडल्या आहेत हा दौरा होणारच आहे, असं किल्लेदार यांनी सांगितलं. ( IPL : हॉस्पिटलमध्ये प्रेम, लग्नाआधीच झालं बाळ, अशी आहे विलियमसनची Love Story ) ‘अयोध्येचा राज ठाकरे यांचा दौरा नियोजित आहे, त्या साठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झाला आहे आणि त्याचबरोबर मुंबईही मेट्रो सिटी आहे. परप्रांतींयाचे सुद्धा या मध्ये योगदान आहे. पण टक्केवारी अशी लावता येणार नाही. यामध्ये टक्केवारी लावली आहे ती चुकीची आहे त्यांनी ही ऐकीव माहीती बोलले राज ठाकरे यांनी या आधी त्यांची भूमिका मांडली आहे, असंही किल्लेदार म्हणाले. ‘राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यांची भूमिका ही उत्तर भारतीयांना पटलेली आहे’, असंही किल्लेदार म्हणाले. ब्रीजभूषण सिंह हे यूपीमध्ये बसून बोलत आहे. त्यांचा काही तरी गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज हा राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हा विषय सामंजस्याने सोडवतील. हा विषय गंभीर असा नाही, असंही किल्लेदार म्हणाले.