JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / st bus strike : आधी मुख्यमंत्र्यांना पत्र आता राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट!

st bus strike : आधी मुख्यमंत्र्यांना पत्र आता राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट!

मुख्यमंत्री ठाकरे हे रूग्णालयात दाखल असल्यामुळे आता राज ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

जाहिरात

मुख्यमंत्री ठाकरे हे रूग्णालयात दाखल असल्यामुळे आता राज ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 नोव्हेंबर : गेल्या आठ दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही कर्मचारी मागे हटण्यास तयार नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (cm uddhav thackery) पत्र लिहिणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी जात आहे. एसटी कर्मचारी हे संपावर असून त्यांच्यात आत्महत्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी एसटीचे काही कर्मचारी राज ठाकरे यांना भेटून गेले होते. त्यामुळे राज ठाकरे आता शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर जाणार आहे. Corona Alert! गेल्या 24 तासांत 500 जणांचा मृत्यू, या राज्यांत वाढतंय टेन्शन यापूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरपत्र लिहिले होते. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांवर कारवाई केली नाही. आता मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे रूग्णालयात दाखल असल्यामुळे आता राज ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये काय चर्चा होते हे पाहण्याचे ठरणार आहे. राज ठाकरेंनी पत्रात काय केली होती मागणी? एसटी राज्य शासनात विलीन करा या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नोटीस बजावली आहे. एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल यांचे भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असे मला वाटते, अशी विनंती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसंच, “एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या