मुंबई, 13 जून: कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील तिजोरीत खडखडाट आहे. राज्यातील जवळपास सर्वच उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्याचा राज्याच्या महसुलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महसुलातील तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारला एक विनंती केली आहे. हेही वाचा… मुंबईत मोठी कारवाई, कॉलेज तरुणांना ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सध्या कोरोना महामारीमुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे. सरकार त्याची भरपाई ही वारंवार पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवून करत आहे, परंतु त्याऐवजी सरकारने सिगरेट आणि तंबाखूजन्य गोष्टींवर ‘कोरोना सेस’ लावून ही महसुली तूट भरुन काढावी आणि पेट्रोल व डिझेलवर नवा कर लादणे सरकारनं थांबवावं, असं बाळा नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.
दरम्यान, यापूर्वीही पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन बाळा नांदगावकरांनी राज्य सरकारला सल्ला दिला होता. महसूल तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये मूल्यवर्धित कर (VAT)वाढवला होता. सरकारनं या ऐवजी दारूवरील कर वाढवावा, असा सल्ला नांदगावकरांनी दिला होता. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं पत्र… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. कोरोना व्हायरस संकट त्यात लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या महसुलावर मोठा परिणामी झाला आहे. राज्यातील महसुली तूट भरून काढण्यासाठी वाईन शॉप्स सुरु करण्यात यावीत, असेही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं होतं. हेही वाचा… पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह त्यानंतर मद्यविक्रीची दुकाने पोलिस प्रशासनाच्या संरक्षणात सुरू करण्याची वेळ सरकार आली. मात्र, त्यात मद्यप्रेमींनी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवल्यानंतर सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. नंतर सरकारने ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी दिली आहे.