JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'मशिदींवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवूया', राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र

'मशिदींवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवूया', राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Mosque Loud Speaker sound) मुद्द्यावरुन आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Mosque Loud Speaker sound) मुद्द्यावरुन आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन याबाबत मनसैनिकांना सूचना केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा कायमचा संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्र पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलं आहे. ते पत्र घराघरांत पोहोचवण्याचा आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? “मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा”, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

“तुम्ही एकच करायचं आहे. माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. ( भाई जगताप शिवसेनेवर भडकले, म्हणाले, कोर्टात जाणार, महाविकास आघाडीवर परिणाम होणार? ) “मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले. मनसे नेमकं काय करणार? दरम्यान, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे नेमकं काय करणार आहे, राज ठाकरेंच्या पत्रात नेमकं काय असू शकतं याबाबतची माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही मनसे नेते संदीप देशपांडे यांची भूमिका जाणून घेतली. “राज ठाकरे यांनी या पत्राचं सुतोवाच पुण्याच्या सभेतही केलं होतं. त्यावेळी सांगितलंही होतं. त्याप्रमाणे महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे ती जबाबदारी पार पाडतील. हा मुद्दा सामाजिक आहे. हा विषय कायमचा संपवायचा याचा अर्थ असा की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी जोपर्यंत राज्य सरकार करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. हे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. निश्चितपणे ही त्याची पुढचीच पायरी आहे. या सगळ्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे याबाबत जनमत तयार होईल त्याचवेळी राज्य सरकारला अंमलबजावणी करायला भाग पडेल. त्याचीच प्रक्रिया मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या आदेशानंतर करत आहेत”, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या