JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून गँगरेप, 9 महिन्यांपासून सुरू होता अत्याचार

मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून गँगरेप, 9 महिन्यांपासून सुरू होता अत्याचार

Minor Girl Gang Rape: डोंबिवलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपींनी पीडितेला नरक यातना दिल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका याठिकाणी देशाला हादरवणारी महिला अत्याचाराची घटना घडली होती. येथील एका 30 वर्षीय महिलेवर अतिशय अमानुष पद्धतीने बलात्कार करून नराधमांनी तिची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना, सामूहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. डोंबिवलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 23 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना डोंबिवलीतील भोपर परिसरातील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी जानेवारी 2021 पासून 22 सप्टेंबर 2021 पर्यंत पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा- ‘मानसिक आजार दूर करण्यासाठी SEX करावं लागेल’, YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत 23 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत, बाकीचे सर्व आरोपी 18 वर्षांपुढील आहेत. हेही वाचा- भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेवर बालात्काराचा प्रयत्न, मुंबईतील घटनेने खळबळ याबाबतची अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने 8 महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान आरोपीने बलात्काराचा व्हिडीओही शूट केला होता. याच व्हिडीओच्या आधारे आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करत अत्याचार केले आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आलं असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या