JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai: जिल्हा परिषदेनं मेंदू ठेवला गहाण; उर्दू शाळेत केली मराठी शिक्षकाची नेमणूक

Mumbai: जिल्हा परिषदेनं मेंदू ठेवला गहाण; उर्दू शाळेत केली मराठी शिक्षकाची नेमणूक

महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषिक शाळा शिक्षकांच्या कमतरतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहेत. अशात विरारमध्ये जिल्हा परिषदेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विरार, 30 नोव्हेंबर: महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषिक शाळा शिक्षकांच्या कमतरतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहेत. पालकही आपल्या पाल्यांना शिकवण्यासाठी इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देत आहेत. अशात भाषिक शाळा टिकवण्याचं आव्हान प्रशासनापुढे आहे. पण विरारमध्ये मात्र जिल्हा परिषदेचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषेदेनं येथील एका उर्दू शाळेत चक्क मराठी शिक्षकाची नेमणूक (marathi teacher appointed in urdu school) केली आहे. संबंधित शिक्षकाला उर्दू येत नसल्याने शाळेच्या व्यवस्थापकीय समितीने मराठी शिक्षकाला माघारी पाठवलं आहे. तसेच उर्दूचं ज्ञान असणाऱ्या शिक्षकाची मागणी केली आहे. संबंधित अजब प्रकार विरार पूर्व बलोच कम्पाऊंड परिसरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत घडला आहे. या शाळेत सध्या 242 विद्यार्थी शिकत असून या शाळेला केवळ दोन शिक्षक आहे. संबंधित दोन शिक्षक मागील दहा वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. अलीकडेच 2017 साली जिल्हा परिषदेनं या शाळेसाठी चार शिक्षक दिले होते. पण तीन वर्षात चारही शिक्षकांची बदली करून टाकली आहे. त्यामुळे संपूर्ण शाळेला शिकवण्याची जबाबदारी केवळ दोनच शिक्षकांवर आली आहे. हेही वाचा- Bhiwandi: मॅरेज ग्राउंडमध्ये भीषण आग; वऱ्हाडींचा मात्र जेवणावर ताव, पाहा VIDEO सध्या या शाळेला विज्ञान, गणित आणि इंग्रजीसाठी प्रत्येकी 2 शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यवस्थापकीय कमिटीने जिल्हा परिषदेकडं शिक्षकांची मागणी केली होती. पण जिल्हा परिषदेनं क्रूर थट्टा करत उर्दू शाळेसाठी मराठी शिक्षकाची नेमणूक केली आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा परिषदेनं या शाळेत इंग्रजी विषय शिकवण्यासाठी हिंदी शिक्षक पाठवला आहे. हेही वाचा- 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा सरकारने काढला जीआर, अशी आहे नियमावली इतर शिक्षक त्यांना उर्दू भाषेत मदत करतील आणि शाळेचं काम चालेल, हे लक्षात घेऊन हिंदी शिक्षकाला उर्दू भरती करून घेण्यात आलं आहे. येथील मुख्याध्यापिका डिसेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या शाळेत पुन्हा शिक्षकांचा तुटवडा होणार आहे. अशात जिल्हा परिषदेनं उर्दू शाळेत मराठी शिक्षकाची नेमणूक केल्याने व्यवस्थापकिय कमिटीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या