JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भाडं नाकारणं टॅक्सी चालकाच्या जीवावर, प्रवाशाकडून निर्घृण हत्या

भाडं नाकारणं टॅक्सी चालकाच्या जीवावर, प्रवाशाकडून निर्घृण हत्या

मुंबईत क्षुल्लक कारणावरुन एका टॅक्सी चालका (Taxi Driver)ची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे: मुंबईत क्षुल्लक कारणावरुन एका टॅक्सी चालका (Taxi Driver)ची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी रविवारी एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर 54 वर्षीय टॅक्सी चालकाची हत्या केल्याचा आरोप आहे. दादर मार्केट (Dadar market)मध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हा नशेत होता. तसंच त्यानं तीन पेव्हर ब्लॉक्स (Paver Blocks)च्या मदतीनं ही हत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुढे पोलिसांनी म्हटलं की, आरोपीचं घर काही अंतरावर होतं. त्यामुळे चालकानं टॅक्सीमध्ये बसण्यास नकार दिला. बसवराज मेलिनामाणी असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील विजयनगरचा रहिवाशी आहे. तो सध्या दादरमधील सेनापती बापट मार्गावरील आंबेडकर नगर येथे राहतो. छबीराज जयस्वार असं मृत टॅक्सी चालकाचं नाव आहे. हेही वाचा-  विजय वडेट्टीवारांनी सांगितलं, 1 जूननंतर ‘असं’ असेल राज्यातलं लॉकडाऊन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादरच्या मार्केटमध्ये आपण मद्यपान केलं आणि त्यानंतर मी टॅक्सी चालकाला घरी सोडण्यास सांगितलं होतं, असं मेलिनामाणी यानं पोलिसांच्या चौकशीत सांगितलं. पुढे पोलीस सांगतात, आरोपीचं घर थोड्या अंतरावर असल्यानं जयस्वार यानं त्याचं भाडं नाकारलं. त्यानंतर चालक आणि आरोपीमध्ये भांडण झालं. चालकानं आपल्याला शिवीगाळ केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. या वादात टॅक्सी चालक फुटपाथवर पडला. तेव्हा आरोपीनं तीन पेव्हर ब्लॉक्स उचलून त्यांच्या तोंडावर मारले, अशी माहिती तपासादरम्यान समोर आलीय. हेही वाचा-  काय सांगता! मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांमुळे पालिकेच्या खजिन्यात कोट्यवधी त्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरुन पळ काढला. सकाळी 6.15 च्या दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती दादर पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चालकाला तातडीनं सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्याआधीच चालकाचा मृत्यू झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या