JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये झाली मध्यरात्री खलबतं

मोठी बातमी : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये झाली मध्यरात्री खलबतं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कातंत्राचे प्रयोग सुरूच आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन घडामोडीनंतर नवी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मध्यरात्री ही बैठक झाल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी भाजपामध्येच सक्रीय होते. आता राष्ट्रवादीमध्ये ते अजित पवारांचे जवळचे म्हणून ओळखले जातात. फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन केलेल्या अल्पजीवी सरकारच्या प्रयोगातही मुंडे यांचे योगदान होते असे मानले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस-मुंडे भेटीनं नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ‘मातोश्री’वर जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला आहे. पण, नव्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. शिंदे समर्थक आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सोमवारी शिंदे सरकारची बहुमताची चाचणी आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांचीही निवड होणार आहे. राज्यातील राजकारणासाठी आगामी काही दिवस महत्त्वाचे आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये मध्यरात्री खलबतं झाल्यानं चर्चांना उधाण आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या