JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Inside Story : शरद पवारांच्या 'या' विश्वासू माणसानेच दिलं अजित पवारांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र!

Inside Story : शरद पवारांच्या 'या' विश्वासू माणसानेच दिलं अजित पवारांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र!

अजित पवारांनी आमदारांच्या कसं मिळवलं याबद्दल शरद पवारांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र आता जी माहिती पुढे आली धक्कादायक आहे.

जाहिरात

Mumbai: Former Maharashtra deputy chief minister Ajit Pawar addresses the media after party workers' meeting ahead of Lok Sabha elections, in Mumbai, Wednesday, March 13, 2019. (PTI Photo) (PTI3_13_2019_000078B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुमीत पांडे, मुंबई 24 नोव्हेंबर : महाराष्‍ट्रात (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिसरा अंक सुरू आहे. आता या अंकाचे शिलेदार वेगवेगळे आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या घोळात वाढ झालीय. या सगळ्या पेचात अजित पवारांच्या (Ajit Pawar) कृतीकडे सर्वांच लक्ष लागलंय. अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचं समर्थन असल्याचं जे पत्र सोपवलं होतं ते पत्र कसं मिळालं याचं रहस्य अजुनही कायम आहे. कारण त्याच पत्राच्या आधारे राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्यासाठी बोलावल्याचं मानलं जातं. असं पत्र अजित पवारांनी कसं मिळवलं याबद्दल शरद पवारांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र आता जी माहिती पुढे आली धक्कादायक आहे. शरद पवारांचे विश्वासू असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानेच अजित पवारांना पत्र दिल्याची माहिती पुढे आलीय. ‘सत्ता येते-जाते पण…’, कुटुंबातील वादावर पुन्हा भावुक झाल्या सुप्रिया सुळे अजित पवारांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याची तयारी सुरू केली होती. त्यानंतर सर्व आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार करून ते पक्ष कार्यालयात ठेवण्यात आलं होतं. तेच पत्र अजित पवारांनी घेऊन राज्यपालांना सादर केलं. अजित पवारांना विधिमंडळाचा नेता निवडल्याचं पत्र हे राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात ठेवलेलं होतं. राष्ट्रवादीचं अशी सर्व पत्र तयार करण्याचं काम हे पवारांचे विश्वासू असलेले शिवाजी गर्जे करतात अशी माहिती आहे. काँग्रेस नेते म्हणाले, हे ‘सरकार’ म्हणजे अल्पवयीन मुलीशी झालेलं ‘लग्न’! गर्जे हे आधी प्रशासकीय अधिकारी होते. पवारांनीच त्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि नंतर महत्त्वाचं पदही दिलं. त्यानंतर ते सगळा महत्त्वाचा पत्रव्यवहार सांभाळत होते. अजित पवारांनी शुक्रवारी त्यांना फोन करून आमदाराच्या समर्थनाचं पत्र मागून घेतलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. आणि हे पक्ष राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याने अजित पवारांनी ते पत्र मागितलं असावं असं गर्जे यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी शरद पवारांना न सांगता ते पत्र अजित पवारांना दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतंय. 30 ऑक्टोबरला अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या