JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING: राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

BREAKING: राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

EC stay on Maharashtra ZP and Panchayat Samiti Election: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परषद निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती.

जाहिरात

राज्यात आता कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे मार्ग मोकळे झाले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै : कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus second wave) अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा (Delta Plus variant of Corona) मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित (EC stays on 5 ZP and 55 panchayat samiti election) करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), अकोला (Akola), वाशीम (Washim) आणि नागपूर (Nagpur) या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. ओबीसी राजकीय आरक्षण: “फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला टाईमपास करायचाय” फडणवीसांनी सांगितलं कारण… सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या