JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / "उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा, मराठी आल्यास..." भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं योगी आदित्यनाथ यांना पत्र

"उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा, मराठी आल्यास..." भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं योगी आदित्यनाथ यांना पत्र

Kripashankar Singh letter to Uttar Pradesh CM Yogi Adityanath: भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवत तेथील शाळेत मराठी भाषा शिकवण्याचं म्हटलं आहे.

जाहिरात

यूपीत मराठीचे धडे? "उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा, मराठी आल्यास..." कृपाशंकर सिंह यांचं योगी आदित्यनाथांना पत्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जून : उत्तरभारतीय तरुण रोजगारासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात येत असतात. याच मुद्द्यावरुन वादही झाले आहेत. या वादाचा नवा अंक आता पहायला मिळण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलेलं पत्र आहे. या पत्रात कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना उत्तरप्रदेशातील शाळांत मराठी शिकवण्याची विनंती (Marathi language in Uttar Pradesh School) केली आहे. उत्तरप्रदेशातील तरुणांना मराठी येत असेल तर त्यांना मराठीत सरकारी नोकरी मिळण्यास सोप्प होईल. असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील सूचना योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन आहे. वाराणसीत प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कृपाशंकर सिंह हे गेली 50 वर्षांहून अधिक काळ मुंबईत राहतात आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा जो अनुभव आहे त्यानुसार, उत्तरप्रदेशातून अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्रात नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी येतात. मात्र, मराठी भाषेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्या हेतूने कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिलं आहे. वाचा :  महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणार, मान्सूनची सद्यस्थिती काय आहे? विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृपाशंकर सिंह यांनी केलेली सूचना विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीसाठी भाजपची खेळी? आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन उत्तरभारतीयांची मते आपल्याकडे वळवण्याचा, खेचण्याचा एक प्रयत्नच कृपाशंकर सिंह आणि भाजपकडून करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. मराठी भाषा शिकण्यास विरोध नाही पण त्याऐवजी.. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं, कुणाला जर मराठी भाषा शिकायचं असेल तर आमचा विरोध असण्याचं कारण नाही. मला असं वाटतं भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापेक्षा तिथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली तर कुणाला महाराष्ट्रात येण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या राज्यात नोकऱ्या मिळतील. 80 टक्के भूमिपूत्रांना रोजगार मिळायला हवा हा नियम आहे. मला असं वाटतं या नियमाचं पालन व्हायला हवं. भाषा शिकण्यास कुणाचाही विरोध नाही. पण रोजगार त्यांनी त्यांच्या राज्यात उपलब्ध करुन द्यावा म्हणजे तिकडेच शिक्षण घेऊन त्यांच्याच राज्यात त्यांना रोजगार उपलब्ध होईल असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या