JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी ! विनाहेल्मेट अथवा सीटबेल्ट न लावल्यास 1000 रुपयांचा दंड

मोठी बातमी ! विनाहेल्मेट अथवा सीटबेल्ट न लावल्यास 1000 रुपयांचा दंड

मुंबई, 30 ऑक्टोबर : राज्यातील (Maharashtra) वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आता विना हेल्मेट (helmet) दुचाकी चालवणाऱ्यांना तसेच सीटबेल्ट (Seatbelt) न लावल्यास त्यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या संदर्भातील हे नवे नियम पुढील आठवड्यापासून लागू होणार असल्याचं बोललं जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा 2019 अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (Maharashtra traffic rules and fine) नव्या नियमांनुसार, मध्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑक्टोबर : राज्यातील (Maharashtra) वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आता विना हेल्मेट (helmet) दुचाकी चालवणाऱ्यांना तसेच सीटबेल्ट (Seatbelt) न लावल्यास त्यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या संदर्भातील हे नवे नियम पुढील आठवड्यापासून लागू होणार असल्याचं बोललं जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा 2019 अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (Maharashtra traffic rules and fine) नव्या नियमांनुसार, मध्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन मोटर वानह कायद्यानुसार, पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास आणि / किंवा 10,000 रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसर्यांता याच गुन्ह्यासाठी कमाल 2 वर्षे तुरुंगवास आणि / किंवा 15,000 रुपयांचा दंड आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी टाइम्स ऑफ इंडिया ला सांगितले, आम्ही काही नियमांच्या दंडात कपात करण्याचा निर्णय घेणार आहोत. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाची अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी तसेच अपघात कमी करण्यासाठी लागू करण्यात येणार आहे. वाचा :  Nashik Accident VIDEO: भरधाव ट्रकची 3 ते 4 वाहनांना धडक टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात पुढे म्हटले की, सूत्रांनी सांगितल्यानुसार फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना 1000 रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास, परमिटशिवाय वाहन चालविल्यास2000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सुधारित दंडात्मक संदर्भात अंतिम अधिसूचना सोमवारी येण्याची शक्यता आहे. तेव्हा वास्तविक दंड आणि शिक्षा नेमकी काय असेल याबाबतची माहिती सार्वजनिक केली जाईल. वाचा :  Shocking VIDEO: गटारावर फटाके फोडताना अचानक उडाला भडका, घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर एका वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने सांगितले, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम लावण्याचं काम मोठा दंड करेल. यासोबतच राज्यातील अपघात कमी करण्यासही मदत होईल. दरवर्षी राज्यात सरासरी 12 ते 13 हजार मृत्यू हे अपघातामुळेच होतात. ही आकडेवारी कमी करत मिशन झिरो फॅटॅलिटी करण्याचं परिवहन विभागाचे टार्गेट आहे. मुंबई मोबॅलिटी फोरमच्या एका सदस्याने सांगितले, अनेक दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याची गरज आहे आणि हेल्मेट न घालणाऱ्या तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालवणारे, वेगाने गाडी चालवणे आणि लेन कटिंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर अंमलबजावणीची तातडीची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या