JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'अशा महिला बिनडोक..' उर्फी जावेद वादात करुणा मुंडेंची उडी; थेट राजकीय महिलांवर साधला निशाणा

'अशा महिला बिनडोक..' उर्फी जावेद वादात करुणा मुंडेंची उडी; थेट राजकीय महिलांवर साधला निशाणा

मॉडेल उर्फी जावेदवरुन सुरू असलेल्या वादात आता करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेतली आहे.

जाहिरात

उर्फी जावेद वादात करुणा मुंडेंची उडी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेदवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात जुंपली आहे. या वादात आता करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेतली आहे. करुणा यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन तिला समर्थन करणाऱ्या महिलांवर जोरदार टीका केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न कपड्यांमध्ये हिंडणाऱ्या उर्फीला पाठींबा देणाऱ्या राजकीय महिला बिनडोक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. करुणा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशा राजकीय महिला बिनडोक : करुणा शर्मा मुंडे राज्यात सध्या उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन जे प्रकरण सुरू आहे. त्या कपड्यांचा मी देखील विरोध करते. अर्धनग्न कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरणे ही वाईट गोष्ट आहे. ही सर्व महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या राजकीय महिला उर्फी जावेदचे समर्थन करतात किंवा तिला पाठींबा देतात, त्यांना लाज वाटायला हवी. कारण, अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन त्या करत आहेत. अशा महिला बिनडोक आहेत, अशी टीका करुणा शर्मा मुंडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

चाकणकर-वाघ यांचा वाद उर्फी जावेदवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमने-सामने आल्या आहेत. उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. यानंतर राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन पुन्हा एकदा चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांचे ट्विट काय होते? “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी 1 ची भर. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला पाठवली आहे.”, असे म्हणत चित्रा वाघ यांनी पुन्हा महिला आयोगावर टीका केली आहे. पुढे त्या लिहतात, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार आहे. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या