JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / संजय राऊत आणि कुणालच्या मुलाखतीची कंगनाने उडवली खिल्ली, स्वत: फोटो केला शेअर

संजय राऊत आणि कुणालच्या मुलाखतीची कंगनाने उडवली खिल्ली, स्वत: फोटो केला शेअर

मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याच्या मुद्यावरून कंगना राणावतने पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर : मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावतने याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कुणाल कामरावर निशाणा साधला आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेतली आहे. कंगनाने वीज पुरवठा ठप्प झाल्याच्या निमित्ताने संजय राऊत आणि कुणालचा फोटो ट्वीट केला. ‘एकीकडे मुंबईत वीज गेली आणि महाराष्ट्र सरकार हे अजूनही क क क…कंगना करत आहे’ असं म्हणत कंगनाने संजय राऊत यांनी कुणालच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.

संबंधित बातम्या

कुणाल कामरा हा  ‘शट अप या कुणाल’ हा पॉडकास्ट कार्यक्रम सुरू करत आहे. या पॉडकास्टची सुरुवात कुणालने संजय राऊत यांची मुलाखत घेऊन केली आहे. मुंबईत रविवारी खार येथील एका खासगी स्टुडिओमध्ये या मुलाखतीचं चित्रीकरण करण्यात आले. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधिक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात. या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या