JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / धक्कादायक! मुंबईतील 7 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक! मुंबईतील 7 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

जनतेला योग्य माहिती मिळावी यासाठी कोरोनाच्या संकटातही पत्रकार दिवस-रात्र एक करीत काम करीत आहेत

जाहिरात

कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगाला संकटात टाकले आहे. यामुळं जगातली तब्बल 180 देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर क्रिकेट क्षेत्रालाही याचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळं क्रिकेटचे सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल : देशभरात कोरोना (Coronavirus) पसरत चालला आहे. असे असताना वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह पत्रकारही (Journalist) विविध ठिकाणी फिरुन परिस्थितीचा नेमका आढावा जनतेपर्यंत पोहचवत असतात. कोरोनाच्या संकट काळात काम करीत असताना मुंबईतील 7 पत्रकारांना कोरोनाची (Covid - 19) लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रिय प्रत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून तसेच अनेक चॅनल्सचा मोठा समूह असलेल्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रसार माध्यमातील सक्रिय पत्रकारांची कोव्हीड-19 चाचणी करावी अशी मागणी केली आहे. मुंबईतील 7 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली असून आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधून सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी असे निर्देश दिले आहेत. वृत्तवाहिन्यांचे सर्वच प्रतिनिधी रात्रंदिन बातम्या प्रसारणाचे काम करीत आहेत. त्यांचे हे काम जोखमीचे असून त्यांनी आपले स्वास्थ सांभाळून काम करावे तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वत्र फिरण्यावर बंधने असावीत, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. कोरोनाच्या मोठ्या संकटातही पत्रकार आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. जनता घरात बसली असताना पत्रकार घराबाहेर पडून परिस्थितीचा आढावा घेत इत्यंभूत बातमी तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. स्वत:कडे दुर्लक्ष करीत ते योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असतात. वेळीअवेळी काम करण्याचीही त्यांची तयारी असते. अशातच पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य ती पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित - लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही Coronavirus : ‘या’ देशातील घरांमधून काढले तब्बल 800 मृतदेह, अधिकारी हादरले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या