मुंबई, 10 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren death case) प्रकरणावरून अधिवेशनात (Maharashtra Budget 2021) भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांसह अनेकांवर जोरदार हल्ला केला. यावेळी अधिवेशनात सचिन वाझेंचा मुद्दा अधिक चर्चिला गेला. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणावर आपली भूमिका मांडली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत स्फोटकं सापडली होती, त्याचाही तपास सुरू आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा ही पद्धत बरी नाही. सध्या ही पद्धत काही जणांनी सुरू केली आहे. सर्व तक्रारींची दखल आम्ही घेत आहोत. नवीन पद्धत आली आहे की, एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याचे थिंडवडे काढायचं. हे चुकीचं आहे. सचिन वाझे कधीतरी शिवसेनेत होते, मात्र त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा शिवसेनेशी काहीच संबधं नाही. सचिन वाझे आमचा कोणी नेता किंवा मंत्री नव्हता. मृत्यू झाल्या नंतर त्याची दखल घेणं हे सरकारचं काम आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर तपास सुरू आहे. एखाद्याला फाशी देऊन चौकशी करण्यापैक्षा आधी चौकशी करू आणि मग फाशी देऊ… विरोधकांना कायदा बदलायचा आहे का…?’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. हे ही वाचा- …मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे- - मात्र राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. एकूणच गेल्या 10 दिवसांसाठी सर्वजण साक्षीदार आहात. - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणं आव्हानात्मक होतं. महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही. - 8 ते 15 दिवसांपूर्वी पंतप्रधानांसमोर व्हर्च्युअल पद्धतीने शेतकऱ्यांच्या विषयावर एक बैठक झाली होती. पीक विम्यासंदर्भात जुनेच नियम ठेवण्यात यावेत, याबाबतही चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं पंतप्रधान वारंवार सांगत आहे, ते जे म्हणत आहेत त्यांनी तसं करुन दाखवावं, ही अपेक्षा. - अजित पवार- महावितरण कंपनीवर बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे पुढे कंपनी कशी चालणार हा प्रश्न आहे. दरम्यान अनेक सोयीदेखील देण्यात आल्या आहेत. मात्र बोजा वाढत असल्याने नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला.