मुंबई, 28 जून: मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानक अंधेरीचा (Andheri Railway Station) लवकरच कायापालट होणार आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Indian Railway Station Development Corporation Limited) इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (IRSDC) हे काम करणार आहे. अंधेरी स्टेशनव्यतिरिक्त मुंबईतील आणखी काही स्टेशनचा कायापालट होणार आहे. टप्प्याटप्यानं अंधेरी स्टेशनचं लूक बदलेल. यासाठी पुनर्विकासाचे एकूण क्षेत्र 4.31 एकर आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 2.1 एकर आणि त्यानंतर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात काम केलं जाईल. पहिल्या टप्प्यात पुनर्विकासासाठी 218 कोटी इतका खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.
IRSDC चे एमडी आणि मुख्य अधिकारी एसके लोहिया यांनी सांगितलं की, मुंबईतल्या अंधेरी स्थानकाव्यतिरिक्त लवकरच दादर, कल्याण, ठाकूर्ली, वांद्रे, सीएसएमटी, ठाणे आणि बोरिवली स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. हेही वाचा- बेंगळुरूत निवडणूक वॉर; डॉन नणदेकडून वहिनीचा खून कसं असेल नवं अंधेरी स्टेशन
अंधेरी स्टेशनवरील सुविधा अंधेरी स्टेशन हे पश्चिम रेल्वे नेटवर्कमधील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. या स्टेशनवरुन छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पनवेलकडे जाणारी हार्बर रेल्वेही धावते. तसंच वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर अशी मेट्रो लाईन देखील आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी एक प्रमुख स्टेशन मानलं जातं. सद्यस्थितीत येथे 9 प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील 8 आणि 9 हे प्लॅटफॉर्म लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. हेही वाचा- विद्यार्थ्यांनो, उदय सामंत यांनी दिली शैक्षणिक वर्षासंदर्भातली मोठी माहिती IRSDC काय आहे? इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (IRSDC) ही RLDA, RITES आणि IRCON ची संयुक्त उद्यम कंपनी आहे. आयआरएसडीसी देशातील रेल्वे स्थानकांचे रुपांतर भारतीय रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या 24x7 हबमध्ये करत आहे आणि नोडल एजन्सी ही मुख्य प्रकल्प विकास संस्था (PDA) आहे.