JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची वाढ; 'या' परिसरात पुन्हा लॉकडाउनची शक्यता

मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची वाढ; 'या' परिसरात पुन्हा लॉकडाउनची शक्यता

पश्चिम मुंबईतील परिसरात कोविड -19 विषाणूच्या नवीन स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या परिसरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेंबूर, 16 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम मुंबईतील चेंबूर (Chembur) परिसरात कोविड -19 विषाणूच्या नवीन स्ट्रेनच्या (Corona virus new Strain) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वॉर्ड कार्यालयाने सोमवारी परिसरातील सोसायट्यांना नव्याने मार्गदर्शक सूचना द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच चेंबूर परिसरातील सोसायटीत येणाऱ्या फेरीवाल्यांना कोविड - 19 ची चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित भागात लॉकडाऊन जाहीर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय परिसरातील वयस्कर लोकांना जैविक सुरक्षा प्रदान करण्यासाठी लवकरात लवकर तातडीची पावलं उचलण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. (वाचा -  राज्यात कोरोनाची नवी लाट! पुन्हा ठरलं देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य ) एका आठवड्यापूर्वी या वॉर्डमध्ये दररोज 15 रुग्णं नोंदवली जात होती. पण आता या परिसरात नवीन कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आता या परिसरात दररोज 25 पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. याठिकाणी दररोज रुग्ण वाढीचा दर 0.28 टक्के एवढा आहे. जो शहराच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा 0.14 टक्क्यांनी अधिक आहे.

(वाचा -  विदर्भात अचानक कोरोनाचा का होतोय उद्रेक? समोर आलं मोठं वास्तव )

या परिसरातील लोकं केंद्र आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोना संबंधित मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करत आहेत. या परिसरात नवीन कोरोना विषाणूच्या रुग्ण वाढीमागे नागरिकांचं बेजबाबदार वर्तन असल्याचं मतं संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. या परिस्थितीची दखल घेत मुंबई महानगरपालिकाने या परिसरातील रहिवाशांना कोविड-19 विषाणू संबंधित मार्गदर्शक सूचनाचं कठोर पालन करण्याचा आदेश दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या